आजच्याच दिवशी 2013 साली भारतीय संघाने इंग्लंड च्या कार्डिफ च्या मैदानावर इंग्लंड ला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी दुसऱ्यांदा जिंकली त्या विजयाची आज दशकपूर्ती त्यानिमित्ताने जागवलेल्या आठवणी आणि त्या विजयाची वैशिष्ठ्ये..भारतीय संघ 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी इंग्लंड ला पोहोचला तो तसं म्हटलं तर अगदी नवखा आणि काही अनुभवी खेळाडू सोबत घेऊन पोहोचला होता.. 2011 च्या विश्वचषक विजयानंतर फारसे चांगले मालिका विजय हाती लागले नव्हते.. कित्येक वर्षांनि भारताने भारताच्या भूमीवर इंग्लंड कडून कसोटी मालिका 2012 साली गमावली होती.. आयपीएल चा ज्वर कमी होऊन भारतीय संघ त्या स्पर्धेत खेळायला उतरला होता..धोनी(कर्णधार, यष्टीरक्षक), अश्विन, जडेजा, कार्तिक, धवन, रोहित शर्मा, मुरली विजय, विराट कोहली, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, इरफान पठाण, सुरेश रैना, उमेश यादव, अमित मिश्रा, विनय कुमार हा भारतीय संघ होता..
याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ठ म्हणजे या संघात दोन वर्षांपूर्वी वर्ल्ड कप जिंकणारे सेहवाग, सचिन, युवराज, झहीर, हरभजन सारखे रणधुरंधर नव्हते सचिन एकदिवसीय प्रकारातून रिटायर झाला होता, हरभजन, सेहवाग,झहीर यांना निवड समिती ने या संघात स्थान दिले नाही, युवराज कॅन्सर च्या आजारातून उभारी घेत होता…या संघाचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे या संघात महेंद्र सिंग धोनी सोडला तर सगळे खेळाडू तिशी च्या आतले होते म्हणजे सरासरी या संघाचे वय 27 च्या आसपास होते…संघाची निवड पाहता बहुतेक जणांना आपण सेमी फायनल गाठली तरी पुरे अशी आशा होती..
भारतीय संघाच्या गटात भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज असे चार संघ होते.. एकदा दक्षिण आफ्रिका पार केलं की सेमी फायनल मध्ये आपला एक पाऊल पोहोचले अशी सगळ्यांना कल्पना होती…स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पहिला सामना बलाढ्य दक्षिण आफ्रिका बरोबर.. सलामी अगदी नवखी रोहित- शिखर ची जोडी.. कोणालाही आशा नव्हती समोर स्टेन, मोरकेल, सोत्सोबे अशी आग ओकणारी फौज..शिखर- रोहित च्या आश्वासक बॅटिंग ने आपण 331 धावा केल्या शिखर धवन ने शतक ठोकले आणि आपण आफ्रिकेचा पेपर 26 रनानी पास झालो..
दुसरा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध,
जॉन्सन चार्ल्स च्या 60 धावांचा जोरावर वेस्ट इंडिज 230 पर्यंत पोहोचली आणि शिखर धवन ने स्पर्धेतल आणि करियर चे सलग दुसरे शतक साजरे करून भारतीय संघ सेमी फायनल मध्ये नेला…
साखळी मधला शेवटचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबर,
आता पर्यंत भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला असल्याने कोणताही दबाव न घेता पाकिस्तान विरुद्ध सहज खेळला.. दुसरीकडे पाकिस्तान पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सामन्याच्या दबावाखाली येऊन केवळ 165 धावा करून गारद झाला.. पावसाच्या व्यत्ययाने भारतीय संघ डकवर्थ लुईस च्या नियमाच्या आधारे सलग तिसरा सामना जिंकून गटात अव्वल ठरून उपांत्य फेरीत पोहोचला..
उपांत्य फेरीत शेजारी श्रीलंका: या आधी भारत- श्रीलंका उपांत्य सामना झाला होता तेव्हा भारतीय संघाला 1996 च्या वर्ल्ड कप मध्ये लाजिरवण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.. विनोद कांबळी चा रडवेला चेहरा आजही सगळ्यांना आठवतो…श्रीलंका रडत खडत 181 पर्यंत पोहोचली.. भारताने परत एकदा निवांत पणे 182 चे लक्ष्य शिखर धवन च्या अर्ध शतकाच्या जोरावर पार केले आणि इंग्लंड बरोबर फायनल निश्चित केली…
23 जून 2013, सोफिया गार्डन्स, कार्डिफ, इंग्लंड: इंग्लंड ला अजून आजच्या बॅझबॉल चा स्पर्श व्हायचा होता.. ते अजूनही नव्वद च्या दशकातले वन डे क्रिकेट खेळत होते. पारंपरिक टेस्ट क्रिकेट चे पाईक कुक, ट्रोट, बेल, ही त्यांची बॅटिंग लाईन अप आणि ब्रॉड अँडरसन, ट्रेमलेट हे लाल ड्युक चे दिग्गज बॉलिंग करत होते.. 2011 च्या वर्ल्ड कप मध्ये बांगलादेश आयर्लंड कडून हरल्यानंतर इंग्लंड ची नाचक्की झाली होती, पण अजूनही 2015 च्या वर्ल्ड कप ची बांगलादेश च्या हातून पराभव व्हायची नामुष्की बाकी होती.. इयॉन मॉर्गन चा कॅप्टन मॉर्गन व्हायचा होता…अंतिम सामन्याच्या दिवशी पाऊस असल्याने सामन्याला उशिरा सुरुवात झाली दिवसभर पिरपीर पाऊस पडल्याने सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू झाला .50 ओव्हर चा सामना 20 ओव्हर वर आला, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंग केली आधी धवन कोहली आणि शेवटी जडेजा यांच्या फटकेबाजी ने भारतीय संघ 129/7 अश्या समाधान कारक धावसंख्ये पर्यंत पोहोचला..बेल, बोपारा, ट्रॉट, यांनी सामना इंग्लंड च्या दृष्टीक्षेपात आणला होता… इंग्लंड च्या डावाची 18वी ओव्हर, मॉर्गन, बोपारा चांगले सेट होऊन खेळत होते.. इंग्लंड ला जिंकण्यासाठी 20 रन पाहिजे असताना धोनी ने इशांत शर्माच्या हाती बॉल दिला, त्या दिवशी इशांत ची बॉलिंग तितकीशी चांगली झाली नव्हती तरी सुद्धा धोनी ने इशांत शर्माला ओव्हर दिली..
पहिला बॉल.. wd
दुसरा बॉल.. 6
तिसरा बॉल.. 1w
चौथा बॉल 1w
पाचवा बॉल.. W (मॉर्गन)
सहावा बॉल W (बोपारा)
दोन्ही सेट बॅट्समन लागोपाठ बाद झाल्याने सामन्याचे पारडे फिरले…
एकोणिसाव्या ओव्हर मध्ये जडेजा ने बटलर आणि ब्रेसनन ची विकेट काढली आणि उरली सुरली इंग्लंड ची आशा आणखी धूसर केली..
शेवटच्या ओव्हर साठी अश्विन च्या हाती बॉल इंग्लंड ला जिंकण्यासाठी 15 धावा स्ट्राईक ला स्टुअर्ट ब्रॉड..
पहिला बॉल .
दुसरा बॉल 4
तिसरा बॉल 1
चौथा बॉल 2
पाचवा बॉल 2
शेवटच्या बॉल ला इंग्लंड ला जिंकण्यासाठी 6 धावा हव्या होत्या.. ट्रेडवेल च्या हाती बॅट सिक्स आणि इंग्लंड चॅम्पियन, दुसरं काहीही झालं तर भारत चॅम्पियन..अश्विन ने बॉल थोडा हवेत ठेऊन ऑफ स्टंप वर बॉल ठेवला ट्रेडवेल च्या स्वीप मधून बॉल सुटला धोनी ने बॉल अडवला आणि आजतागायत भारतीय संघाने शेवटची ट्रॉफी त्या क्षणी जिंकली…
भारतीय संघाने 11 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली महेंद्र सिंग धोनी आयसीसी च्या सगळ्या ट्रॉफी जिंकणारा पहिला कॅप्टन बनला…
ठळक नोंदी:
1. या स्पर्धेने रोहित शर्मा चे करियर ओपनर म्हणून सेट केले पुढे 5-6 वर्ष शिखर- रोहित जोडी ओपनिंग करत राहिली..
2. शिखर धवन आणि आयसीसी स्पर्धेतील त्याचा फॉर्म ही दंतकथा झाली.
3.भारतीय गोलंदाजी झहीर च्या सावली तुन बाहेर पडून स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करत होती.. सचिन शिवाय भारताची ही पहिली आयसीसी स्पर्धा होती…
4. भुवनेश्वर कुमार हा प्युअर स्विंग बॉलर गवसला..
5. रवींद्र जडेजा नावाचा अष्टपैलू सिद्ध झाला…