I trust this letter finds you wrapped in the echoes of the recent ICC Men’s Cricket World Cup 2023 final—an event that unfolded like a mesmerizing symphony of emotions, leaving an indelible mark on the canvas of our shared cricketing passion. As we come together to reflect on this experience, I invite you to join me in exploring the ebbs and flows, the highs and lows and the emotional crescendo that encapsulated our journey alongside the Indian cricket team.
The aftermath of the final still lingers and the heartbreak is palpable. It’s a bittersweet concoction of jubilant cheers and silent tears, a demonstration of the profound impact cricket has on our lives. Every four struck, every six soared and every wicket fell, creating ripples that resonated with the very soul of our cricket-loving hearts. The tearful response of that young fan in a poignant video mirrors the raw, unfiltered emotions that bind us together as a diverse community of cricket enthusiasts, transcending age, ethnicity and background.
Australia’s triumphant comeback in the final, orchestrated by the brilliance of Travis Head and the match-winning partnership with Marnus Labuschagne, evokes a complex concoction of admiration and sorrow. Despite our team’s stellar 10-match winning streak leading up to the final, the haunting echoes of India’s 2003 World Cup loss to Australia persist, reminding us of cricket’s capricious nature—a potent blend of exhilarating victories and agonizing defeats.
In extending our heartfelt appreciation to our cricketing heroes, from seasoned campaigners like Rohit Sharma and Virat Kohli to rising stars like Mohammed Siraj and Shubman Gill, we must acknowledge the depth of passion and commitment that permeated every corner of the cricketing arena.
However, let us not be confined by the momentary sting of defeat. Instead, let’s delve into the philosophical realm of cricket, where winning and losing are mere waypoints in a grander narrative. Cricket, like life, is transient. It weaves its textile with victories and defeats, triumphs and tribulations. This defeat, as poignant as it may feel now, is but a fleeting moment in the grand embroidery of our cricketing journey.
The beauty of cricket lies not solely in the final scorecard but in the spirit that binds us together as a global cricketing community. The unpredictable twists, the thrill of the game and the camaraderie it fosters among fans from diverse backgrounds are what make this sport truly beautiful.
In the resounding words, “Dhoni finishes off in style!” let us not forget that cricket is more than just a series of outcomes—it’s a celebration of the game itself, the shared joy and the enduring bonds it creates among fans.
As we navigate through the waves of emotions, remember that this, too, shall pass. Cricket, with its inherent uncertainties, will continue to enthral us and our resilient team will rise again. Thank you for being an integral part of this emotional rollercoaster, and here’s to the enduring spirit of cricket that unites us all—celebrating the shared joy and enduring bonds it creates among fans.
२०२३ ची विश्वचषक स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. टी-२० क्रिकेट आणि फ्रँचाइज क्रिकेटचं प्रस्थ कितीही बोकाळलं तरी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाची मजा काही औरच आहे. यंदाचा हा तेरावा विश्वचषक, आणि भारतात होणार चौथा. आधी आपण ३ वेळा (१९८७, १९९६ आणि २०११) मध्ये विश्वचषक आयोजित केला आहे. यावेळी ही स्पर्धा पूर्णपणे भारतात होणार आहे. भारतातील १० शहरे सामन्यांसाठी सज्ज आहेत, आणि आता सगळे संघ देखील भारतात दाखल झाले आहेत. ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याने स्पर्धेची सुरुवात होईल आणि १९ नोव्हेंबर रोजी आपल्याला या स्पर्धेचा विजेता समजेल. ही स्पर्धा तब्बल ६ आठवडे चालणार आहे. जगातील १० सर्वोत्कृष्ट देश या स्पर्धेत भाग घेतील, एकूण ४८ सामन्यानंतर आपल्याला नवीन विश्वविजेता मिळेल. २०१९ च्या विश्वचषकात इंग्लंडने पहिल्यांदा या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. ज्या देशाने जगाला क्रिकेट दिले, त्यांना एकदिवसीय स्पर्धेच्या विजेतेपदासाठी ५० पेक्षा जास्त वर्षे वाट बघावी लागली. आजपर्यंत झालेल्या स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाने ५ वेळा, भारत आणि वेस्टइंडीजने २ वेळा तर पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंडने प्रत्येकी एकदा हा विश्वचषक जिंकला आहे. या स्पर्धेसाठी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे २ वेळचे विजेते वेस्टइंडीज २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत खेळणार नाहीत. त्यांना या स्पर्धेसाठी पात्रता फेरी खेळावी लागली आणि ते त्या फेरीतून बाद झाल्यामुळे मुख्य स्पर्धेत खेळणार नाहीत.
२०२३ च्या स्पर्धेत १० संघ आहेत, जे प्रत्येक संघाविरुद्ध एक सामना खेळतील. त्यानंतर सर्वोत्कृष्ट ४ संघांमध्ये उपांत्य सामने होतील, त्यातून अंतिम सामना खेळवला जाईल आणि आपल्याला नवीन विजेता मिळेल. आयसीसीने ठरवलेला हा स्पर्धेचा फॉरमॅट खरोखर चांगला आहे. सर्वप्रथम १९९२ साली या फॉरमॅटमध्ये सामने खेळवले गेले होते, आणि त्यानंतर २०१९ ची स्पर्धा देखील अशीच खेळवली गेली. या फॉरमॅटमुळे प्रत्येक संघाला एकमेकांविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेतील काही सामन्यांकडे सर्वांचीच नजर असणार आहे. या यादीतील पहिला सामना म्हणजे अर्थातच भारत विरुद्ध पाकिस्तान. हे दोन्ही संघ आता फक्त आयसीसी ट्रॉफीमध्येच खेळताना दिसतात. १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होणारा हा सामना आधीच हाऊसफूल झाला आहे यात काही वाद नाही. या सामन्याची तिकिटे काही पटींनी विकली जात आहेत, अहमदाबादची हॉटेल्सच नाही तर हॉस्पिटल्स, धर्मशाळा इत्यादी ठिकाणे देखील पूर्णपणे भरली आहेत अशा बातम्या येत आहेत. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम पूर्णपणे भरून जाईल, लाखो लोक मैदानावर आणि जगभरातून कित्येक कोटी लोक टीव्हीवर या सामन्याचा आनंद घेतील यात काही शंका नाही. तशीच काही हालत भारताच्या बहुसंख्य सामन्यांची असेल. भारतीय संघाला घरच्या मैदानावर, तेही विश्वचषकात खेळताना बघणं आपल्या भारतीयांना नक्कीच आवडेल. भारताचे सामने देखील बहुतेक सर्व शहरांमध्ये – हैदराबाद वगळता, आयोजित केले गेले आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे संघ क्रिकेट रसिकांचे हॉट फेव्हरेट असतील, त्यामुळे त्यांचे सामने बघण्यासाठी रसिकांची गर्दी होईल यात शंका नाही. स्पर्धेचा पहिलाच सामना – इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, तसेच इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान हे सामने देखील चुरशीचे होतील अशी अपेक्षा आहे.
क्रिककथा दिवाळी अंकासाठी बुकिंग सुरु झालं आहे. लेख वाचता आहातच, पटकन बुकिंग पण करून टाका…. https://crickatha.com/shop/
स्पर्धेतील काही संघ – अफगाणिस्तान, नेदरलँड्स, बांगलादेश आणि श्रीलंका, यांची स्पर्धा जिंकण्याची शक्यता तशी कमी आहे. श्रीलंका वगळता इतर संघ फारसे प्रभावी ठरतील अशी शक्यता देखील नाही, पण प्रसंगी कोणत्याही संघाला हरवण्याची ताकद या संघांमध्ये आहे. एखाद्या संघाची लय बिघडण्याचे काम हे नक्की करू शकतात. श्रीलंकेकडे संभाव्य विजेते म्हणून बघणे थोडे अवघड आहे, पण नशिबाची साथ असेल तर ते उपांत्य फेरीपर्यंत नक्की जाऊ शकतील. पाकिस्तानचा संघ कोणत्याही आयसीसी स्पर्धेत कायमच धोकादायक असतो. त्यांची कामगिरी दर आठवड्याला येणाऱ्या नवीन बॉलिवूडच्या चित्रपटासारखी असते. कोणता चित्रपट गल्ला जमवेल (आणि काय कारणामुळे जमवेल) हे सांगणे जसे अवघड आहे, तसेच पाकिस्तानची कामगिरी कशी होईल, ते हिट ठरतील का फ्लॉप होतील हे सांगणे देखील सोपे नाही. नुकत्याच झालेल्या आशिया कप स्पर्धेत ते भारताकडून पराभूत झाल्यानंतर त्यांचे मनोधैर्य देखील कमी असेल. अशावेळी चांगली कामगिरी करून संघाला विजेतेपदाच्या शर्यतीत नेणे हे संघ व्यवस्थापनासाठी महत्वाचे असेल. तशीच काहीशी गत दक्षिण आफ्रिकेची आहे. फरक इतकाच की आफ्रिकेचा संघ मोक्याच्या क्षणी भरात आला आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्यांनी लक्षणीय विजय मिळवला आहे, त्यामुळे क्रिकेट जगताच्या नजर त्यांच्याकडे आहेतच. अर्थात आयसीसी ट्रॉफी आणि दक्षिण आफ्रिका हे विळ्याभोपळ्याचे नाते आहे. आफ्रिकेचा संघ मोक्याच्या क्षणी आयसीसी ट्रॉफीमध्ये मार खातो हा आजवरचा अनुभव आहे. पण तरीही या संघावर नक्कीच लक्ष असेल.
गेल्या स्पर्धेत अंतिम फेरीत खेळलेले दोन संघ – इंग्लंड आणि न्यूझीलंड हे नक्कीच फेव्हरेट असतील. इंग्लंडने गेल्या काही वर्षात आपला खेळाचा दर्जा चांगलाच उंचावला आहे. ‘बाझबॉल’ पद्धतीचे क्रिकेट खेळताना ते प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. २०१९ विश्वचषकानंतर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने संघ उभारणी केली आहे. सलग दुसरे विजेतेपद मिळवण्यासाठी ते नक्कीच उत्सुक असतील. त्यांच्या २०१९ च्या विजेतेपदाचा नशिबाचे गालबोट होते, ते झटकून आता विजय मिळवणे त्यांच्यासाठी महत्वाचे असेल. या नवीन संघात तशी ऊर्जा आणि इच्छाशक्ती आहे, त्यामुळे हा संघ धोकादायक ठरू शकतो. न्यूझीलंडचा संघ देखील तितकाच धोकादायक आहे. हा संघ म्हणजे कोणताही गाजावाजा न करता शांतपणे आपला खेळ करणारा आहे, आणि कदाचित त्यामुळेच तो क्रिकेट रसिकांचा आवडता संघ आहे. गेल्या दोन विश्वचषक स्पर्धेतले (२०१५ आणि २०१९) ते उपविजेते आहेत. आता या स्पर्धेत तो एक मोठा अडथळा पार पाडणे हेच त्यांचे लक्ष असेल. संघातील प्रमुख खेळाडूंनी योग्य कामगिरी केल्यास हा संघ अंतिम ४ मध्ये नक्की असेल, किंबहुना असावा असे क्रिकेट रसिकांची इच्छा आहे. ऑस्ट्रेलियन संघ आयसीसी स्पर्धेत नेहमीच चांगला खेळतो. किंबहुना आयसीसी स्पर्धेत त्यांचा खेळ कायम ऊंचावतो. ऑस्ट्रेलियन संघ कायमच प्रोफेशनल पद्धतीने मैदानावर खेळतो आणि प्रतिस्पर्धी संघाला वरचढ होण्याची संधी देत नाही. आक्रमकता हेच त्यांचे प्रमुख अस्त्र असते. नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या मालिकेत त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला तरी देखील त्यांना हलके घेणे इतर कोणत्याही संघाला परवडणारे नाही. ऐन मोक्याच्या क्षणी ते आपला खेळ उंचावतात आणि बाजी मारतात. ऑस्ट्रेलियन संघ ५ वेळचे विजेते आहेत, आणि या स्पर्धेत देखील ते संभाव्य विजेते असतील. संघाचा गेल्या काही महिन्यांचा प्रवास बघता ते अंतिम चार मध्ये नक्की असतील. सरतेशेवटी आपल्या भारतीय संघावर करोडो भारतीय क्रिकेट रसिकांचे लक्ष असेल. घरच्या मैदानावर खेळण्याचा त्यांना नक्की फायदा होईल. फक्त स्पर्धेच्या वेळी असलेला दबाव ते कसा हाताळतात हे बघणे महत्वाचे असेल. भारतीय संघाने नुकताच आशिया कप जिंकला आहे, आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील मालिका जिंकली आहे. आपले खेळाडू चांगल्या लयीत आहेत आणि त्यामुळेच या संघाकडून अपेक्षा आहेत. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचेल असे निश्चित वाटते.
एकूणच येणारे ५-६ आठवडे भारतात क्रिकेटमय असतील यात शंका नाही. क्रिकेट हा अनेक भारतीयांसाठी जीव की प्राण आहे. त्यात १२ वर्षांनंतर भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत जगातील सर्वोत्कृष्ट १० संघ जीवाची बाजी करतील. विजेतेपद एकाच संघाला मिळणार आहे, पण या निमित्ताने होणारे ४८ सामने क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असेल. २०२३ ची ही दिवाळी ‘क्रिकेटवाली दिवाळी’ असेल यात शंका नाही.
हैदराबादने आपल्याला अनेक अप्रतिम क्रिकेटपटू दिले आहेत. गेल्या ५०-६० वर्षातील खेळाडूंवर नजर टाकली तर अबिद अली, अब्बास अली बेग, एम एल जयसिम्हा, मोहम्मद अझहरुद्दीन, व्ही व्ही एस लक्ष्मण, अंबाती रायुडू किंवा हनुमा विहारी सारखी नावं सहज घेता येतील. प्रामुख्याने हे सगळे फलंदाज. अगदी गोलंदाजांची गणना करायची झाली तरी अर्शद अयुब, वेंकटपथी राजू किंवा प्रग्यान ओझा असे मंदगती गोलंदाज सुद्धा आठवतील. (हैद्राबादचाच नोएल डेव्हिड आठवतोय का?) पण वेगवान गोलंदाजांच्या बाबतीत हैद्राबादचं नाव पटकन कोणी घेतलं नसतं. आज मोहम्मद सिराजने ती उणीव देखील भरून काढली. गेल्या काही वर्षांत भारतीय वेगवान गोलंदाजांची एकप्रकारची दहशत निर्माण झाली आहे, त्यामध्ये बुमराह आणि शमी पाठोपाठ सिराजचं देखील नाव घेता येईल. कालच्या आशिया कपच्या अंतिम सामन्यानंतर तर सिराजचं नाव सुवर्णअक्षरांनी लिहायला हवं आहे.
कालचा दिवस सिराजचा होता. ७ षटकात २१ धावा देऊन ६ बळी. एकाच षटकात चार बळी. केवळ १६ चेंडूंमध्ये श्रीलंकेचा संघ मुळापासून उखडला…. महर्षी व्यासांनी हे क्रिकेटचं महाभारत लिहायला घेतलं असतं तरी इतकं परफेक्ट लिहिलं नसतं. काळ सिराजच्या गोलंदाजीला बिर्याणीचा तिखटपणा होता, ती सुद्धा साधी सुधी बिर्याणी नाही, तर स्पेशल हैद्राबादी तडका बिर्याणी. कोणीही गोलंदाज स्वप्नात सुद्धा विचार करू शकणार नाही अशी ती गोलंदाजी होती. त्या षटकात सिराजने श्रीलंकेची वरची फळी अक्षरशः कापून काढली. खरं तर सलग चार चेंडूंवर चार बळी मिळायचे, पण एक चौकार गेलाच मध्ये. चालायचंच, चंद्रावर सुद्धा डाग असतोच की. निसंका, समरविक्रमा, असलंका आणि डिसिल्व्हा… श्रीलंकेचे चार फलंदाज माघारी परतले, पाठोपाठ पुढच्या दोन षटकात कप्तान दसून शनका आणि मेंडिस देखील. या ७ षटकातच सिराजच्या आशिया कप खिशात घातला होता. भारतीय गोलंदाजांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये काही भन्नाट स्पेल्स टाकले आहेत. सिराजच्या या स्पेलची गणना पहिल्या क्रमांकावर असेल यात काही वाद नाही. सिराजच्या त्या स्पेल्स मधले २ त्रिफळाचित (बोल्ड्स) – शनका आणि कुशल मेंडिस, आणि धनंजय डिसिल्वाला टाकलेला चेंडू तर दृष्ट काढण्याजोगे होते.
या सामन्यात भारताने अवघ्या ५० धावांवर श्रीलंकेला बाद केलं. सिराजच्या ६ बळी मिळवलेच, पण हार्दिकने ३ आणि बुमराहने १ बळी मिळवताना आपले हात देखील धुवून घेतले. हार्दिकने आपल्या कोट्याच्या १० ओव्हर्स टाकणे किती महत्वाचे आहे हे आता आपल्या लक्षात येईल. सिराजमुळे झालेली ती पडझड श्रीलंकेला सावरूच शकली नाही. त्यांचा कोणताही फलंदाज क्रिझवर टिकण्याच्या मूडमध्ये नव्हता. त्यातच भारतीय गोलंदाजांच्या लाईन आणि लेंग्थ मध्ये हे फलंदाज अडकत होते. श्रीलंकेचा संपूर्ण संघ केवळ १५ षटकात सर्वबाद होणं ही खरं म्हणजे नामूष्कीच आहे. आनंदाची गोष्ट ही की अवघ्या १५-१७ दिवसांवरच विश्वचषक आला असताना भारतीय संघ एक एक बॉक्स टिक करायला लागला आहे. पाकिस्तानच्या सामन्यानंतर आपण ज्या पद्धतीने कात टाकली आहे त्याला तोड नाही. हो मधेच बांगलादेशच्या सामन्यासारखा एखादा स्पीड ब्रेकर येतो, पण प्रवासात असा स्पीड ब्रेकर देखील आवश्यक असतोच.
श्रीलंकेला इतक्या स्वस्तात बाद केल्यानंतर आपला विजय होणारच होता, पण आपल्या तरुण तडफदार फलंदाजांनी तो विजय देखील अगदी सहज मिळवला. केवळ ६.१ षटकात भारताने ही माफक धावसंख्या ओलांडली, आणि ते करताना आपला एकही बळी जाणार नाही याची देखील काळजी घेतली. क्रिकेटच्या भाषेत अशा विजयला ‘क्लिनिकल’ म्हणतात. ईशान किशन आणि शुभमन गिल या दोघांनीही थंड डोक्याने विजय मिळवून दिला. इतक्या सहजपणे विजय मिळवणे आपल्यासाठी तशी अवघड गोष्ट आहे, पण ती देखील आता सध्या होताना दिसते आहे. हा आशिया कप आपल्यासाठी खरंच वरदान ठरला आहे. संघातील बहुतेक फलंदाजांनी चांगल्या धावा केल्या आहेत. रोहित, विराट, गिल, राहुल, ईशान आणि हार्दिक … सगळेच कुठे ना कुठे चमकले आहेत. तीच गत गोलंदाजांची. बुमराह अनेक महिन्यानंतर मैदानावर परतला तरी बळी घेण्याची त्याची भूक अजूनही शाबूत आहे. तिकडे कुलदीपने आपल्या फिरकी गोलंदाजीवर बळी मिळवले, तर शार्दूल किंवा शमी देखील चांगली गोलंदाजी करताना दिसले. हार्दिक आणि जडेजा गोलंदाज म्हणून देखील समर्थपणे उभे राहताना दिसत आहेत. आणि कालच्या सामन्यात सिराजने तर कमाल केली आहे.
आशिया चषकासाठी आपला संघ जाहीर झाला तेंव्हा बरेच प्रश्न होते. अर्थातच काही खेळाडूंच्या निवडीवरून, काही खेळाडूंच्या फॉर्म वरून आणि काही खेळाडूंच्या दुखापतींमुळे. आता विश्वचषक स्पर्धा केवळ १७ दिवसांवर आली असताना यातील काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळाली असतील अशी आशा आहे. बहुतेक खेळाडूंनी या स्पर्धेत चांगला खेळ केला आहे. विश्वचषक स्पर्धेच्या आधी आपण ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ सामन्यांची एक मालिका खेळू, ती आपल्यासाठी पूर्वपरीक्षा असेल. पण आता आपलं लक्ष मात्र ५ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या महत्वाच्या परीक्षेकडे आहे. १२ वर्षांपूर्वी धोनीच्या संघाने आपल्याला विश्वविजयी बनवले होते, आता अपेक्षा आहे रोहित आणि मंडळी त्या कामगिरीची पुनरावृत्ती करतील. आशिया कप नावाचा एक पेपर आपण सहज सोडवला आहे, अंतिम परीक्षेत काय होते ते बघणे महत्वाचे.
भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना – या वाक्यातच बरंच काही साठलेलं आहे. या दोन देशांमध्ये क्रिकेटच्या मैदानावर असलेली खुन्नस आपण कायमच अनुभवतो, नव्हे आपण अनेकदा जगलो आहोत. गेली काही वर्षे आपण उभय देशांमधील मालिका खेळत नाही, पण आयसीसीच्या स्पर्धेत समोरासमोर आलो की दोन्ही देशांमधील हे द्वंद्व बघायला मिळतं. किंबहुना गेल्या काही वर्षात आयसीसीची कोणतीही स्पर्धा केवळ याच सामन्याकडे डोळे ठेवून खेळवली जाते का अशी शंका यावी. टी-२० असो अथवा एकदिवसीय सामना असो, दोन्ही संघ जीवाची बाजी लावून खेळताना दिसतात. आणि अर्थातच त्या सामन्यात भारताने विजय मिळवावा अशीच आपली भारतीयांची इच्छा असते. मागच्यावर्षी टी-२० विश्वचषकात मेलबर्नमध्ये झालेला सामना असो अथवा मागच्या आठवड्यात आशिया कप स्पर्धेत कोलंबो मध्ये झालेला एकदिवसीय सामना असो, प्रत्येकवेळी दोन्ही देशांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती. या सामन्याची काय मजा आहे, खेळाडूंच्या आणि प्रेक्षकांच्या देखील काय भावना आहेत हे जर एखाद्याला समजावून सांगावे लागत असेल तर तो मनुष्य भारत-पाकिस्तानातील नाही किंवा त्याला क्रिकेट आवडत नाही असेच म्हणावे लागेल. प्रत्येकवेळी आम्हा क्रिकेट रसिक त्याच भावनेने मैदानावर किंवा टीव्ही समोर (आता मोबाईल समोर) बसतो. क्रिकेट खेळणाऱ्या कोणत्याही देशाकडून हरलात तरी चालेल पण पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंका(च), अशी क्रिकेटप्रेमींची भावना असते.
१०-११ सप्टेंबर २०२३ हे दोन दिवस असेच विलक्षण होते. कोलंबोमधे भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ भिडणार, म्हणजे संपूर्ण क्रिकेट जगताच्या नजरा त्या सामन्याकडे होत्या. काहीच दिवसांपूर्वी झालेला गटसाखळी मधला सामना पावसामुळे पूर्ण झाला नव्हता. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी त्या सामन्यात कमाल केली होती. भारतीय फलंदाजांना जखडून ठेवण्यात ते कमालीचे यशस्वी झाले होते. ईशान किशन आणि हार्दिक पांड्या उभे राहिले नसते तर कदाचित आपला डाव १५० मधेच आटोपला असता. पण या दोन्ही फलंदाजांनी दर्जेदार खेळ केला आणि आपल्याला एक सन्मानजनक स्कोअर उभा करण्यात मदत केली. दुर्दैवाने पावसामुळे पाकिस्तानचा डाव खेळता आला नाही. त्यांचे फलंदाज आणि आपले गोलंदाज यामधील सामना झालाच नाही. पण सुपर ४ च्या लढतीत संयोजकांनी आयत्यावेळी काही बदल केले आणि खास या सामन्यासाठी ‘रिजर्व्ह डे’ ठेवण्यात आला. त्यामुळे २ दिवस चाललेल्या या सामन्याचा निकाल तर लागलाच पण दोन्ही संघांच्या बलाबलाचा अंदाज देखील आला.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली. आपल्या वेगवान गोलंदाजांवर त्याचा खासच भरवसा होता. आणि का नसेल? शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह या घडीचा सर्वोत्तम ‘पेस अटॅक’ आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पहिल्या सामन्यात देखील तिघांनी भारतीय फलंदाजांना सतावले होते. पण सलामीला आलेल्या रोहित आणि गिलच्या मनात काही वेगळेच होते. Attack is the best defence या तत्वानुसार दोघांनीही या गोलंदाजांची पिसं काढायला सुरुवात केली. त्यांच्या वेगाचाच फायदा घेऊन चेंडू सीमापार जाऊ लागले आणि तिघांचीही लय बिघडली. केवळ १३ षटकात भारताने शंभरी गाठली होती, आणि दोघेही फलंदाज अप्रतिम बॅटिंग करत होते. नाही म्हणायला नसीम शाहची गोलंदाजी काही प्रमाणात भेदक वाटत होती. त्याने दोन्ही फलंदाजांना त्रास द्यायला सुरुवात केलीच होती. रोहित आणि गिल पाठोपाठ बाद झाले आणि नंतर आलेल्या विराट आणि राहुलने सूत्रे आपल्या हातात घेतली. पण त्याचवेळी आलेल्या पावसाने त्या दिवशीचा खेळ थांबवावा लागला. दुसरा दिवस याच दोघांचा होता. सुरुवातीला काही वेळ स्थिरावण्यासाठी घेतल्यावर, दोघांनीही पाकिस्तानी गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. ज्या पद्धतीने विराटने आपला डाव उभारला त्याला तोड नाही. पहिल्या ५० धावांची ५५ चेंडू घेणाऱ्या विराटने पुढच्या ७२ धावा काढायला फक्त ३९ चेंडू घेतले. राहुलने देखील त्याला चांगली साथ दिली. त्याच्या फिटनेसवर असलेलं प्रश्नचिन्ह या खेळीमुळे दूर झालं असं म्हणायला हरकत नाही. विराटबरोबर ३०-३२ षटके मैदानावर उभे राहणे, दोघांच्याही धावा पळून काढणे यात तो यशस्वी ठरला.
विराट आणि राहुलच्या खेळीनंतरच पाकिस्तानात अनेक टीव्ही सेट फुटले असतील. त्यांची जी काय उरली सुरली आशा होती, ती भारतीय गोलंदाजांनी धुळीस मिळवली. जसप्रीत बुमराहच्या फिटनेसवर देखील प्रश्न होतेच, पण त्यानेच पाकिस्तानी फलंदाजीला खिंडार पाडायला सुरुवात केली. त्याची लाईन आणि लेंग्थ प्रभावी होती. त्यावरच इमाम उल हक बाद झाला. तिकडे हार्दिकने अप्रतिम चेंडूवर बाबर आझमला बोल्ड केलं, शार्दुलने तशाच एका चेंडूवर रिझवानला घरी पाठवलं आणि भारताचा विजय सुनिश्चित झाला. ४ बाद ७७ वरून पाकिस्तानी संघ किती तग धरेल हाच प्रश्न होता. विजयाचे पुढचे सोपस्कार कुलदीप यादवने पूर्ण केले. त्याची गोलंदाजी एकही पाकी फलंदाजाला खेळता येत नव्हती. केवळ ३२ षटकात पाकिस्तानचा डाव १२८ धावांत आटोपला, आणि भारताने तब्बल २२८ धावांनी विजय मिळवला. भारताच्या क्रिकेट इतिहासातील हा एक मोठा आणि महत्वाचा विजय आहे हे नक्की. या दोन देशांमधला सामना कायमच भारतीय फलंदाज विरुद्ध पाकिस्तानी गोलंदाज असा बघितला जातो, पण या सामन्यात भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांची नांगी ठेचली. महिनाभरातच हे दोन्ही संघ परत एकदा समोरासमोर येतील, ते देखील विश्वचषकात. त्यावेळी भारतीय संघाला कोलंबो मध्ये झालेल्या या सामन्यामुळे एक वेगळा कॉन्फिडन्स आला असेल यात काही शंका नाही.
विराट आणि पाकिस्तान हे वेगळं नातं आहे. आपण वेळोवेळी मैदानावर ते बघितलं आहे. विराट मोठ्या सामन्याचा खेळाडू आहे, आणि त्याने ते सिद्ध देखील केलं आहे. टी-२० विश्वचषकात मेलबर्नला खेळताना त्याने हॅरिस रौफला आखूड टप्प्याच्या चेंडूवर समोर लॉन्गऑन च्या डोक्यावरून एक षटकार मारला होता, तसाच षटकार त्याने परत एकदा भारताच्या डावात शेवटच्या चेंडूवर मारला. तो षटकार असेल किंवा रोहितने पहिल्या षटकात आफ्रिदीला मारलेला षटकार असेल, भारतीय फलंदाजांनी आपली तयारी दाखवून दिली आहे. आता प्रतीक्षा आहे ती विश्वचषक सामन्याची.. प्रीलिममध्ये उत्तीर्ण झालेला भारतीय संघ बोर्डाच्या परीक्षेत कशी कामगिरी करतो हे बघणे महत्वाचे आहे.
२०२३ चा क्रिकेट विश्वचषक अवघ्या एक महिन्यावर आला असताना मागच्या आठवड्यात भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीने १५ सदस्यीय संघाची घोषणा करताना आशिया कप साठी निवडलेला संघच कायम ठेवला. रोहित शर्मा संघाचा कर्णधार असेल आणि हार्दिक पांड्या उपकर्णधार. अर्थातच या संघात काही ‘सरप्राइजेस’ नाही बघायला मिळाले. बहुतेक खेळाडूंची निवड यथायोग्य होती, पण काही महत्वाच्या जागांसाठी कोणते खेळाडू निवडणार याकडे बहुतेकांचे लक्ष होतेच. १२ वर्षानंतर या विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. २०११ मध्ये झालेली स्पर्धा आपण जिंकलो होतो. त्यानंतर २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी वगळता एकही आयसीसी स्पर्धेत आपल्याला यश मिळालेले नाही. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅट्स मध्ये आयसीसी स्पर्धेत आपण कायम उपांत्य किंवा अंतिम फेरीत जाऊन हरतो आहोत. कदाचित त्यामुळेच या विश्वचषक स्पर्धेकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष आहे. ही घरच्या मैदानावर होणारी स्पर्धा आपण जिंकावी अशीच भारतीय रसिकांची इच्छा आहे.
निवडलेल्या संघाचा विचार करता कागदावर हा संघ नक्कीच तुल्यबळ वाटतो. पण तसेही कोणत्याही महत्वाच्या स्पर्धेतील भारतीय संघ कागदावर नेहेमीच तुल्यबळ असतो. आपल्या फलंदाजीचा विचार करता संघात रोहित, विराट, शुभमन गील , श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव सारखे दर्जेदार फलंदाज आहेत. पण सध्या बहुतेकांच्या बॅट्स त्यांच्यावर रुसल्या आहेत. फॉर्मात असलेला आणि सलग गोलंदाजांची पिसं काढणारा रोहित, किंवा सरळ बॅटने मैदानाच्या चारही कोपऱ्यात चेंडू भिरकावून देणारा विराट बघून आता किती महिने झाले हे आठवावेच लागेल. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर दोघेही पूर्वपुण्याईवर संघात आहेत असं म्हणता येईल. परवा पाकिस्तानविरुद्ध दोघेही ज्या पद्धतीने बाद झाले ते बघता विश्वचषक स्पर्धेत अनेक दर्जेदार गोलंदाजांचा सामना ते कसा करतील हा प्रश्न पडला आहे. आज दोघेही वयाच्या पस्तिशीत आहेत, अशावेळी खरं तर याआधीच दोघांनीही आपल्या फॉर्मकडे बघता आपली जागा रिकामी करायला हवी होती का? शुभमन गील आयपीएल पर्यंत प्रचंड फॉर्म मध्ये होता, पण टेस्ट चॅम्पियनशीप नंतर मात्र त्याची बॅट बोलेनाशी झाली आहे. हा खरोखर गुणवान फलंदाज आहे, पण पाठीशी धावा नसतील तर खेळाडूची निवड व्यर्थच ठरते ना. श्रेयस अय्यर देखील गेले अनेक महिने दुखापतग्रस्त आहे. आशिया कप मध्ये त्याने संघात पुनरागमन केले खरे, पण ९ चेंडूच्या एका खेळीनंतर त्याने विश्वचषक संघात येणे कुठेतरी खटकते. सूर्यकुमार यादवची देखील तीच तऱ्हा. तो टी-२० सामन्यात खोऱ्याने धावा काढतो आहे, पण एकदिवसीय सामन्यात मात्र त्याची बॅट रुसते. अशावेळी त्याच्याऐवजी दुसरा फलंदाज येऊ शकला असता का?
आपल्याकडे के एल राहूल आणि ईशान किशन असे दोन यष्टीरक्षक फलंदाज आहेत. अर्थातच राहूलला आपण मारून मुटकून यष्टीरक्षक केलं आहे. तो देखील दुखापतीमधून सावरतो आहे. अशावेळी त्याची कोणत्याही प्रकारे फिटनेस टेस्ट न घेता, कमबॅक नंतरचा फॉर्म न बघता त्याला संघात स्थान मिळाले आहे. राहूल आणि श्रेयस गेले अनेक महिने कोणत्याही स्पर्धात्मक क्रिकेटपासून लांब आहेत. अशावेळी त्यांना लगेचच संघात स्थान मिळणे हा इतर अनेक क्रिकेटपटूंचा अपमान नाहीये का? दुसरीकडे ईशान किशन मात्र चांगल्या पद्धतीने धावा करतो आहे. सलामीला असो अथवा मधल्या फळीत, तो आपली भूमिका नक्कीच पार पाडतो. तो डावखुरा असल्याचा थोडा फायदा मिळतो हेही नसे थोडके. अर्थात त्याला आपल्या यष्टिरक्षणावर काम करणे आवश्यक आहे. पण कोणत्याही अंतिम संघात निवड होताना कर्णधार आणि उपकर्णधार यानंतर त्याची निवड होणे सार्थ वाटते.
१९८३ किंवा २०११ चा विश्वचषक जिंकताना आपल्या संघात अनेक अष्टपैलू खेळाडू होते. कपिल किंवा युवराज भोवती आपण आपले डावपेच रचू शकत होतो. या विश्वचषक स्पर्धेत आपल्याकडे हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि शार्दूल ठाकूर सारखे अष्टपैलू खेळाडू आहेत. पैकी कोणत्या खेळाडू भोवती आपण आपली व्यूहरचना करणार आहोत? हार्दिक पांड्याने काही चांगल्या खेळी केल्या असल्या तरी त्याची तुलना कपिल देव बरोबर किंवा अक्षर पटेलची तुलना युवराज बरोबर नाही होऊ शकत. शार्दूल ठाकूर कधीतरी दोन-चार फटके मारतो, पण म्हणून त्याला ऑलराऊंडर म्हणणं म्हणजे नेपाळच्या क्रिकेट संघाला आशिया कपचा विजेता म्हणण्यासारखं आहे. रवींद्र जडेजा हा मात्र खऱ्या अर्थाने ऑलराऊंडर आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर तो प्रभावी गोलंदाज ठरेल, मैदानावर तो २०-२५ धावा अडवेल आणि गरजेच्या वेळी तो चांगली फलंदाजी देखील करेल याची खात्री वाटते. जडेजा आणि चालला तर हार्दिक यांच्या जोरावर आपण ‘अष्टपैलू’ विभागाचा कोटा पूर्ण करतो आहोत. इथे अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अक्षर पटेलची निवड. जडेजा संघात असताना परत त्याच पठडीतला गोलंदाज संघात असणे चुकीचे वाटते. आपण संघात आपल्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजाला स्थान देत नाही, किंबहुना त्याचा विचार देखील करत नाही याचे नवल वाटते. इतर संघांमध्ये अनेक डावखुरे चांगले फलंदाज असताना आपल्या संघात रविचंद्रन अश्विन नसावा हे आपले वैचारिक दारिद्रय म्हणावे का? अश्विन किंवा युझवेन्द्र चहलची निवड होणे आवश्यक होते. पण निवड समितीने या दोन उत्तम फिरकी गोलंदाजांना डावलून – तेही एक ऑफस्पिनर आणि दुसरा चांगला लेगस्पिनर, जडेजा-अक्षर-कुलदीप या तीन डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांना स्थान दिले आहे.
वेगवान गोलंदाजी विभागात बुमराहचे पुनरागमन आशादायक आहे. त्याने काही सामने खेळून आपला फिटनेस देखील सिद्ध केला आहे. दुसरीकडे शमी आणि सिराज यांनी देखील आपली निवड सार्थ ठरवली आहे. हे तिघेही फॉर्मात असतील तर प्रतिस्पर्धी संघ हतबल होतो हे आपण बघितले आहे. पण एखाद्या दिवशी विश्वविजेत्या संघाला धूळ चारणारे आपले गोलंदाज नंतरच्या सामन्यात अगदी सामान्य संघापुढे हात टेकतात हे देखील आपल्याला ठाऊक आहे. किंबहुना तो आपला इतिहास आहे असे म्हटले तरी चालेल. परवा नेपाळ विरुद्धच्या सामन्यात देखील आपण हे अनुभवले आहे. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे आपल्या संघात एकही डावखुरा वेगवान गोलंदाज नाही. खरे तर झहीर खान नंतर आपण असा कोणी गोलंदाज तयार केलाच नाही. आज जागतिक क्रिकेटमध्ये ट्रेंट बोल्ट, मिशेल स्टार्क, सॅम करन, शाहीन आफ्रिदी, मुस्ताफिझूर रहमान सारखे डावरे वेगवान गोलंदाज धुमाकूळ घालत असताना आपण मात्र त्यांना चटणी कोशिंबिरी इतके देखील स्थान देत नाही. एकूणच या १५ खेळाडूंचा संघ आताच्या घडीला कागदी वाघ वाटतो. या वाघांनी चांगला खेळ केला तर ठीक आहे, अन्यथा परत एकदा आपण या स्पर्धेतून लवकर बाहेर पडू. गेले तीन विश्वचषक आपण निदान उपांत्य फेरीत पोहोचतो आहोत, यावर्षी तेच ध्येय ठरवून आपल्याला पुढे जावे लागेल. मार्ग कठीण आहे, पण आपले १५ शिलेदार तोपर्यंत तयार होतील अशी आशा करूया.
विश्वचषक स्पर्धेचं वर्ष आहे. आपला संघ जोरदार तयारी करतो आहे. वेगवेगळ्या स्पर्धा, इतर काही देशांशी द्विपक्षीय मालिका सुरु आहेत. कधी भारतात तर कधी परदेशात भारतीय संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आहे. आणि अशातच चौथ्या क्रमांकावर खेळायला आपल्याकडे एकही धड फलंदाज नाही. त्या क्रमांकावर आपण अजूनही अडखळतो आहोत. त्या क्रमांकावर खेळण्यासाठी योग्य खेळाडूचा शोध सुरु आहे. कधी अमक्याला आजमावून बघ, कधी तमक्याकडे ती जबाबदारी दे असा काहीसा प्रयोग सुरु आहे. ही गोष्ट ऐकल्यासारखी वाटते ना? क्रिकेट रसिकांना तर अगदी अनुभवल्यासारखी वाटत असेल. अहो चार वर्षांपूर्वी, २०१९ च्या विश्वचषकाच्या वेळी हेच तर घडत होतं. इंग्लंडमध्ये झालेल्या त्या विश्वचषक स्पर्धेच्या वेळी आपण चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजासाठी झगडत होतो. अंबाती रायुडू, अजिंक्य राहणे सारख्या फलंदाजांचा विचार सोडून देऊन आपण इतर काही खेळाडूंना मारून मुटकून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवत राहिलो. के एल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत…अहो इतकंच काय पण विजय शंकरला देखील आपण त्या क्रमांकावर खेळवत राहिलो. आणि शेवटी त्याचा व्हायचा तो परिणाम झालाच. आपली सलामीची जोडी एखाद्या सामन्यात चमकली नाही आणि मधल्या फळीवर त्याचा भार आला, तो सामना हातातून गेलाच. उपांत्य फेरीत, न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात हेच घडलं आणि आपण विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडलो. हे सगळं परत आठवायचं कारण म्हणजे २०२३ हे देखील विश्वचषकाचं वर्ष आहे. भारतात होणार विश्वचषक आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे, आणि आपण परत एकदा चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूसाठी झगडतो आहोत.
क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळायला येणारा खेळाडू म्हणजे खऱ्या अर्थाने संघाचा कणा असतो. टी-२० क्रिकेटचं जाऊ द्या, पण कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचं महत्व वेगळंच आहे. सलामीची जोडी टिकून उभी आहे आणि जोरदार खेळ करत आहे, संघाला अपेक्षित धावसंख्या समोर दिसते आहे. अशावेळी तो रन रेट वाढवण्याची जबाबदारी या फलंदाजाची असते. समजा सुरुवातीचे खेळाडू लवकर बाद झाले, आणि सामना गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे झुकत चालला असेल तर आपल्या संघाला चांगल्या स्थितीत घेऊन जाण्यासाठी या फलंदाजालाच प्रयत्न करावे लागतात. कोणत्याही संघाची मधली फळी, जी चौथ्या क्रमांकापासून सुरु होते, बरेचदा संघासाठी महत्वाची कामगिरी करत असते. कदाचित त्यामुळेच हा चौथ्या क्रमांकाचा खेळाडू / फलंदाज महत्वाचा ठरतो. आज क्रिकेट इतकं बदलल्या नंतरही बहुतेक संघ या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजासाठी आग्रही असतात. पण विश्वचषक इतका जवळ येऊन देखील आपल्याला या विश्वचषकात आपला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज कोण असेल हे सांगता येत नाही.
आज भारतीय संघाला दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. खेळाडू आणि दुखापती हे अगदी जवळचं नातं आहे. आपल्या बाबतीत देखील तेच होतंय. मागच्या वर्षी आपला प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त होऊन नॅशनल क्रिकेट अकॅडमी (NCA) मध्ये दाखल झाला. त्याची दुखापत बरेच दिवस चालली. त्यात आपण त्याला खेळवण्याची घाई केली, आणि नको तेच घडलं. त्याला परत एकदा NCA चा रास्ता पकडावा लागला. त्यानंतर रिषभ पंतचा तो दुर्दैवी अपघात झाला. दुर्दैवाने तो अजूनही स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे. जीवघेण्या अपघातातून तो बाहेर आला हाच मोठा चमत्कार असताना, तो परत स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये कधी येईल हे सांगता येणे अवघड आहे. आपल्या क्रिकेटचा आणि अधिकाधिक सामने खेळण्याचा अट्टहास आपल्या खेळाडूंच्या जीवाशी येतो याचा विचार कोणीच करत नाही. कोलूला जुंपलेल्या बैलासारखे हे खेळाडू वर्षातले बारा महिने खेळत असतात. कधी आंतरराष्ट्रीय मालिका, तर वर्षातले २ महिने न थकता आयपीएल यामुळे खेळाडू शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या देखील कमजोर होतात. गेल्या काही महिन्यात के एल राहुल, श्रेयस अय्यर सारखे खेळाडू NCA च्या वाऱ्या करत आहेतच. आपले तीन प्रमुख फलंदाज (पंत, राहुल आणि अय्यर) जायबंदी झाल्याने आपला चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूचा प्रश्न सुटला तर नाहीच, पण तो अधिक गहन झाला आहे. रिषभ पंत इतक्या लवकर मैदानावर दिसणार नाहीच, त्यामुळे राहुल आणि अय्यर या दोघांमध्ये चौथ्या क्रमांकासाठी चुरस असेल.
आपल्या आजच्या विश्वचषक संघाचा विचार करता रोहित, विराट, गील, ईशान किशन सारख्या फलंदाजांचं स्थान पक्कं आहे. हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा किंवा काही प्रमाणात अक्षर पटेल सारखे अष्टपैलू खेळाडू आपली खालची फळी सांभाळतील. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजूनही न स्थिरावलेला सूर्यकुमार यादव आणि या फॉरमॅट मध्ये अजिबात न आजमावलेला तिलक वर्मा हे देखील महत्वाचे फलंदाज आहेत, पण आत्ता ऐन मोक्याच्या क्षणी त्यांच्यावर जबाबदारी देता येईल का अशी शंका आहे. अशावेळी आपण फिरून फिरून परत एकदा राहुल आणि श्रेयस अय्यरकडेच येतो आहोत.
विश्वचषकाच्या आधी आपण आशिया कप खेळतो आहोत आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची एक छोटी मालिका होईल. या एकूण ८-९ सामन्यांमध्येच आपल्याला हा हुकमी एक्का शोधणं आणि तपासणं आवश्यक आहे. राहुल आणि अय्यर अनेक महिन्यांनंतर संघात परत येतील, त्यांचा फॉर्म कसा असेल, त्यांची दुखापत परत डोकं वर काढेल का हे प्रश्न असतीलच. की आपण रोहित-गील कडे सलामीची जबाबदारी देऊन ईशान किशनला चौथ्या क्रमांकावर खेळायला पाठवू? काही दिवसांपूर्वी रवी शास्त्रीने चौथ्या क्रमांकासाठी विराट कोहलीचे नाव सुचवले, तर आपण तसा काही प्रयोग करून बघू असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत.
आपल्या एकदिवसीय संघाच्या सेटअप मधून आपण काही वर्षांपूर्वी अजिंक्य राहणे सारख्या फलंदाजाला बाहेर फेकलं. वास्तविक तो संघातील सर्वोत्तम फलंदाज होता, अजूनही आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या फलंदाजाची आक्रमकता आणि फलंदाजीचे योग्य तंत्र या दोहोंची सांगड त्याच्याकडे आहे. फॉर्म नाही या कारणास्तव तो एकदिवसीय संघातून बाहेर पडला आणि आपल्याला चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांचा प्रश्न सतावू लागला. आज तो संघात असता तर हा प्रश्न कदाचित निर्माण झालाच नसता. पण मोकळ्या मानाने त्याला परत संघात सामील करून घेण्याइतका मोठेपणा आपल्याकडे नाही. आणि आता उपलब्ध असलेल्या फलंदाजांमधून योग्य फलंदाज शोधणे हे नक्कीच जिकिरीचे काम आहे. दुर्दैवाने सध्याच्या घडीला आपण अजूनही के एल राहुल आणि श्रेयस अय्यर या दोन फलंदाजांपलीकडे बघू शकत नाहीये. या दोघांनीही तंदुरुस्त होऊन चांगला खेळ करावा आणि भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेत चांगले यश मिळवून द्यावे हीच आशा असेल. सध्यातरी त्यांच्याच खांद्यावर चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूची महत्वाची जबाबदारी आहे.
बहुचर्चित आशिया कप क्रिकेट स्पर्धा आता केवळ २ दिवसांवर आली आहे. खरे तर आशिया मधील ही मोठी स्पर्धा म्हटली गेली पाहिजे. आज भारतीय उपखंडातील बहुतेक सर्वच देश आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतात. या वर्षीच्या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे संघ सहभागी होणार आहेत, म्हणजे ही खरी तरी भारतीय उपखंडाचीच स्पर्धा आहे. स्पर्धा कधी खेळवायची, कुठे खेळवायची असे सगळे महत्वाचे मुद्दे आणि त्यामुळे होणाऱ्या खंडीभर चर्चा पार पडल्यानंतर पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशात हे सामने आयोजित होत आहेत. ३० ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेचे काही सामने पाकिस्तानात तर बहुतेक सर्व महत्वाचे सामने (भारताचे सर्वच) श्रीलंकेत पार पडतील. या स्पर्धंनंतर ३-४ आठवड्यातच विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होईल, त्याची पूर्वतयारी म्हणून या स्पर्धेकडे बघितले जात आहे, आणि त्यामुळे देखील ही स्पर्धा महत्वाची ठरते. नेपाळ वगळता इतर सर्वच संघ विश्वचषकात सहभागी होत असल्याने प्रत्येक संघाला आपली बलस्थाने या स्पर्धेद्वारे तपासून घेता येणार आहेत.
भारतापुरता विचार करायचा झाल्यास, आपल्या गटात पाकिस्तान आणि नेपाळ या दोन संघांचा समावेश आहे. अर्थातच भारत विरुद्ध पाकिस्तान ही लढत किमान २ वेळा होईल याची संयोजकांनी खबरदारी घेतली आहे. अंतिम सामन्यात पुन्हा एकदा हे संघ समोरासमोर आले तर ती तिसरी लढत असेल. काही दिवसांपूर्वीच आपला भारतीय संघ जाहीर झाला, आणि आशिया कप स्पर्धेवर नजर ठेवत आपण आता बऱ्यापैकी विश्वचषकाचा संघ देखील काय असेल याचा अंदाज बंधू शकतो. रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आता या दोन्ही स्पर्धांसाठी तयार आहे का हा खरा कळीचा प्रश्न आहे. आशिया कप स्पर्धेसाठी झालेल्या संघ निवडीमुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत हे नक्की. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा. मागच्याच आठवड्यात आपला मॅच फिटनेस दाखवणारे जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा सारखे खेळाडू या संघात आहेत, तर अजूनही आपल्या फिटनेसशी झगडणारे के एल राहूल आणि श्रेयस अय्यर देखील आशिया कप संघाचा भाग आहेत. त्यात काही रिपोर्ट्स प्रमाणे राहूल अजूनही फिट असल्याचे दिसत नाही, त्यामुळे तो एखाद दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. त्यात आपण राहूल कडे यष्टिरक्षकाची जबाबदारी देखील देऊ पाहत आहोत. या दोन्ही खेळाडूंची यो-यो टेस्ट देखील झाली नाहीये असेही सांगितले जात आहे. गेले अनेक महिने ते क्रिकेटपासून दूर आहेत अशावेळी विश्वचषक स्पर्धेवर नजर ठेवून त्यांना या स्पर्धेद्वारे आजमावण्याचे प्रयत्न होत आहेत. एखाद्या खेळाडूला मुख्य प्रवाहात इतक्या लवकर आणण्यामागे बीसीसीआयची काय भूमिका असावी? खेळाडूला दुखापत होणे अपरिहार्य आहे, पण त्या दुखापतीमधून त्याला पूर्ण बरे होऊ देणे, त्याचे नीट पुनर्वसन (Rehabilitation) होणे आवश्यक आहे असे कोणाला नाही का वाटत?
जी गत राहुल आणि अय्यरची तीच काही प्रमाणात बुमराह आणि प्रसिद्धची आहे. अर्थात त्या दोघांनी निदान २ टी-२० सामने खेळून स्वतःला सिद्ध तरी केले आहे. पण तरीही काही प्रमाणात ही एक रिस्क आहेच ना. टी-२० सामन्यात ३-४ षटके गोलंदाजी करणे आणि आशिया कप किंवा विश्वचषकासाठी पूर्णपणे फिट असणे यामध्ये मोठा फरक आहे. एकीकडे या चार खेळाडूंच्या फिटनेसचा प्रश्न उभा आहे, तर दुसरीकडे काही खेळाडूंची निवड का झाली आहे असा प्रश्न पडतो. यात प्रामुख्याने एक नाव समोर आले ते म्हणजे तिलक वर्मा याचे. या गुणी तरुण खेळाडूला संधी मिळावी असे नक्की वाटते, तशी ती त्याला मिळते देखील आहे. पण या एकदिवसीय स्पर्धेसाठी त्याची निवड त्याचे टी-२० क्रिकेटमधले योगदान बघून मिळते आहे. आयपीएलमधील चांगल्या कामगिरीमुळे त्याला भारताच्या टी-२० संघात स्थान मिळाले, आणि तिथे जरा बरी कामगिरी झाल्यानंतर तो जर एकदिवसीय आशिया कप साठी संघात येत असेल तर काही चुकते आहे का? तीच अवस्था सूर्यकुमार यादवची. तो टी-२० क्रिकेटमध्ये भन्नाट खेळतो, पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र सातत्याने फ्लॉप होतो आहे. अशावेळी इतर काही खेळाडूंना साधी द्यायला हवी होती का? संघातील इतर फलंदाजांची निवड होणार होतीच. किंबहुना त्याच फलंदाजांवर आपल्या संघाची भिस्त असेल. पण विश्वचषक स्पर्धा आणि चौथ्या क्रमांकावर खेळणारा खेळाडू हा आपला प्रश्न कायम असेल. अशावेळी संघाच्या चौकटीत अजिंक्य राहणे सारखा खेळाडू बसू नये याचे नवल वाटते.
वेगवान गोलंदाजांचा विचार करता फारसे काही प्रश्न उद्भवत नाहीत, पण फिरकी गोलंदाजांचे काय. जगातील सर्वोत्तम ऑफ स्पिन बॉलर तुमच्या संघात नसतो? आज बहुतेक सर्वच संघात ३-४ डावखुरे फलंदाज असताना तुम्ही अश्विन सारख्या गोलंदाजाला बाहेर ठेवता? आजच्या संघात रवींद्र जडेजा सारख्या गोलंदाजांची निवड अपरिहार्य आहे, पण त्याच शैलीतल्या अक्षर पटेलला स्थान मिळते? जडेजा आणि अक्षर दोघेही एकाच प्रकारचे फलंदाज आणि गोलंदाज देखील आहेत, मग दोघेही कशाला? चहलला संघात न निवडल्यामुळे देखील प्रश्न उभे राहिले आहेत. पण कदाचित कुलदीप यादवची निवड जास्त अचूक असू शकेल. अर्थात या विभागाकडे बघता रवी अश्विन संघात नाही याचे वाईट वाटते आणि या सांघिक योजनांवर प्रश्न देखील निर्माण होतात.
या स्पर्धेला इतके महत्व येण्याचे कारण म्हणजे आता विश्वचषक स्पर्धा केवळ काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे या आशिया कप संघात खेळणारे खेळाडूच कमी जास्त प्रमाणात विश्वचषक संघात असतील हे निश्चित आहे. सर्वच खेळाडूंना आपली बलस्थाने आजमावण्याची संधी या स्पर्धंद्वारे मिळत आहे. कदाचित म्हणूनच या स्पर्धेसाठी झालेली संघनिवड महत्वाची ठरते. विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून बघत असताना हे खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे लक्ष असेल. खेळाडू चांगले खेळले, दुखापतींपासून लांब राहिले तर ठीकच. पण दुर्दैवाने काही गोष्टी चुकीच्या घडल्या तर विश्वचषकासाठी त्या बदलण्याचा वेळ देखील आपल्याकडे नाही. या निवडलेल्या संघातील १५ खेळाडूच विश्वचषक संघाचा भाग असणार आहेत, त्यामुळे या खेळाडूंवर लक्ष असणे अपरिहार्य आहे.
फेब्रुवारी – मार्च २००३ चा काळ.. बारावी बोर्डाची परीक्षा आणि क्रिकेटचा वर्ल्ड कप या दोन्हींचा मुहूर्त त्या वर्षी एकच होता.. १ मार्चला पुण्याच्या एसपी कॉलेजच्या मुलींच्या होस्टेलची टीव्ही रूम खचाखच भरलेली होती. कुणी टीव्हीत डोळे घालून बसलंय… कुणी जपमाळ ओढतंय… कुणी अथर्वशीर्षाची आवर्तनं करतंय.. कुणी आपल्या कुलदेवतेचा धावा करतंय… कुणी स्टॅच्यू पोझिशन घेतलेय. एक-एक बॉल पडून सामना जसा पुढे सरकत होता तसं वातावरणातल्या टेन्शनचा पारा कधी वर कधी खाली अशा कन्फ्यूजन मोडमध्ये होता. आता असं जेव्हा वातावरण असेल तेव्हा वेगळा अंदाज बांधायलाच नको. भारत पाकिस्तान सामना सुरू होता.. अट्ठाविसावी ओव्हर.. शोएबचा वेगवान बॉल हलकेच प्लेस करत सचिननं एक धाव काढली आणि ९८ गाठले .. आणि त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला… तिकडे मैदानात सचिन कळवळत होता. इथे आमच्या होस्टेलच्या टीव्ही रूममध्ये टेन्शनचा पारा उकळत होतं.. बारावीची परीक्षा असूनही मीसुद्धा तिथेच ठाण मांडून बसले होते. स्कोअर बोर्डवर सचिनच्या नावापुढे ९८ चा आकडा होता.. आता हव्या फक्त दोन धावा की धम्माल… सगळेच श्वास रोखून, डोळे विस्फारून टीव्हीकडे पाहत होते. अठ्ठाविसाव्या ओव्हरचा तिसरा बॉल, शोएब अख्तरनं धावायला सुरुवात केली श्वास रोखून आम्ही सगळ्याजणी जणू टीव्हीतच घुसलो होतो. आणि हाय रे कर्मा, शोएबच्या त्या उसळत्या बॉलनं घात केला आणि युनिस खाननं झेपावत झेल घेतला. सचिन शतकापासून अवघ्या दोन धावा दूर राहिला. तिथून पुढे मॅचचं काय झालं हे जगजाहीर आहे. आणि माझ्या बारावीच्या निकालाचा इतिहास उगाळण्यात अर्थ नाही. इथे मांडायचा महत्वाचा मुद्दा म्हणजे क्रिकेट या खेळावर असलेलं वेडं प्रेम, त्यातल्या खेळाडूंवर दाखवलेली देवासारखी श्रद्धा, धर्मयुद्धासारख्या क्रिकेटवरून झालेल्या चर्चा, आणि सामना जिंकल्यानंतर ऐन् उन्हाळ्यातही साजरी झालेली दिवाळी.. आहा काय दिवस होते ते..
तसा माझा आणि क्रिकेटचा संबंध अगदी फार जुना आहे. लिटल मास्टर सुनील गावस्कर यांना “छोनील गावश्कल” म्हणण्याएवढी मी ‘लिटल’होते तेव्हापासून क्रिकेट पाहत आले आहे. बालपण लहान गावात होतं. त्या काळी ९० च्या दशकात टीव्हीचा फार प्रसार नव्हता. माझ्या जन्मानंतर काही दिवसांनी बाबांनी आमच्या घरी सोनीचा टीव्ही घेतला होता. आमच्या पंचक्रोशीतला हा पहिला टीव्ही, त्यामुळे त्याचं अप्रूपही मोठं होतं. दर रविवारचं रामायण-महाभारत आणि क्रिकेटचे सामने असले की आमच्या घरच्या ओटीवर मुंगी शिरायलाही जागा नसायची. पंचक्रोशीतली माणसं टीव्ही पाहायला आमच्या घरी असायची. क्रिकेटचे सामने असले की आमच्या गावासह आजूबाजूच्या चार-पाच गावच्या शाळांचे मास्तर बरेचदा शाळा लवकर सोडून घरी क्रिकेट पाहायला हजर असायचे. मग जसा सामना रंगायचा तसा आरडा-ओरडा, ललकाऱ्यांनी घर दणाणून निघायचं. आजचं चित्र काहीसं वेगळं दिसतं. माझ्या आठवणीत मी गेले कित्येक वर्षात अशा वेडात बुडून जाऊन क्रिकेटचा सामना बघितल्याचं आठवतच नाही. माझ्यासारखी भावना कदाचित अनेकांची असेल. माझ्या नजरेत याची तीन प्रमुख कारणं आहेत. पहिलं म्हणजे क्रिकेटमध्ये झालेले मॅच फिक्सिंगचे आरोप, दुसरं कारण म्हणजे आयपीएलसारखा फॉरमॅट, आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण अतीपरिचयात अवज्ञा.
२००० साली दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनियेवर भारताविरुद्धच्या सामन्यात मॅच फिक्सिंगचा आरोप झाला. आणि त्यानंतर आपला कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि अजय जडेजा यांचं नाव त्यात आलं. याचा विसर पडत होताच, पण आयपीएलमध्ये हे मॅच फिक्सिंगचं भूत पुन्हा बाटलीतून बाहेर आलं. दुर्दैवानं स्वतःला क्रिकेट चाहते म्हणवणारे काही उथळ लोक प्रत्येक हरलेल्या मॅचचा संबंध मॅच फिक्सिंगशी जोडायला लागले. तथ्य असेल-नसेल पुढची गोष्ट पण क्रिकेटप्रेमींच्या मनात याचा किंतू कायमचा पाचर ठोकल्यासारखा राहिला. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे क्रिकेटचा बदललेला फॉरमॅट… क्रिकेट हा खेळ यापूर्वीही व्यावसायिक पातळीवर खेळला जात होता. पण बरीच वर्ष त्यातही देशांच्या सीमा अबाधित राहिल्या होत्या. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानात कायम एक देश विरुद्ध दुसरा देश पाहायला मिळत असे. त्यामुळे तो सामना पाहताना क्रिकेटप्रेमासोबत देशप्रेमही उचंबळून यायला वेळ लागायचा नाही. आता आयपीएलसारख्या फॉरमॅटमध्ये सर्वच देशाचे खेळाडू मांडीला मांडी लावून एका संघात बसलेले दिसतात. त्यामुळे त्या मैदानात उत्तम सुरू असलेलं क्रिकेट चाहत्यांच्या मनात फक्त मनोरंजनापुरतं मर्यादित राहिलेलं दिसतं.
तिसरं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अतीपरिचयात अवज्ञा. असं म्हटल्यानं मी कदाचित तुम्हाला थोडीशी ‘ओल्ड स्कूल टाईप्स’ वगैरे वाटेन, पण हे वास्तव आहे. पूर्वी क्रिकेटचे सामने फार नसत. त्यातही ते पाहण्यासाठी द्राविडी प्राणायाम घालावा लागत असे. ९० च्या दशकात टीव्ही फार तळागाळात पोहोचले नव्हते. त्यावेळी पंचक्रोशीतल्या एखात्या टीव्हीवर क्रिकेटप्रेमीची मदार असायची. शहरातल्या मध्यमवर्गातही अशीच स्थिती. त्यामुळे कधीतरी पाहायला मिळणाऱ्या क्रिकेटची गोडी होती. त्यानंतर टीव्ही प्रत्येक घरी आले. क्रिकेटचे सामने वाढले. रंगीत टीव्हीवर क्रिकेट बघण्याची मजा आणखीनच जास्त होती. अनेकांनी क्रिकेट मॅच गेट-टुगेदर्सही केली असतील. क्रिकेटला आयुष्यातल्या आठवणींच्या डायरीत कोरून ठेवणारा असा तो काळ होता. आता प्रत्येकाच्या हातातल्या मोबाईलवर क्रिकेट पाहता येतं. बसमध्ये, ट्रेनमध्ये, माळरानावर, घराच्या कोनाड्यात, चौकातल्या पारावर, अंथरुणात झोपून, मध्यरात्री, पहाटे, दुपारी, दिवसातल्या कोणत्याही प्रहरी आणि नेटवर्क असलेल्या कोणत्याही ठिकाणी क्रिकेट पाहता येतं. इतक्या सहज सोनं जरी मिळालं तरी त्याची गोडी राहत नाही. दुर्दैवानं क्रिकेटच्या बाबतीत तेच होतंय.
आमच्या आयुष्यात क्रिकेटचं जे स्थान आहे. ते आजच्या मिलेनियल किड्सच्या मनात कधी आणि कसं बनेल हा मला पडलेला एक भाबडा प्रश्न आहे. क्रिकेटचे मैदानातले किस्से ऐकणं ही जशी पर्वणी असते. तसे क्रिकेटचे मैदानाबाहेरचे आपल्या आयुष्यात घडलेले किस्सेही सुरस असतात. भारत-पाक सामना बघण्यासााठी शाळेत मारलेला मास बंक, वर्ल्डकपची मॅच पाहण्यासाठी बोर्डाचा पेपर लवकर देऊन काढलेला पळ, मैत्रिणीच्या घरी ६५ इंचाच्या एलईडी टीव्हीवर पाहिलेले क्रिकेटचे सामने आणि गप्पांची मैफल, ऑफिसमधून निघायला उशीर झाल्यानं रस्त्यावर टीव्हीच्या शोरूमसमोर घोळक्यात उभी राहून पाहिलेली मॅच असे हजारो किस्से माझ्या आठवणींच्या डायरीत साठलेले आहे. आज हातातल्या मोबाईलमध्ये क्रिकेट पाहणाऱ्यांना त्याची गोडी काय कळेल? कारण प्रेम, धर्म, देश, धाकधूक या सर्व भावनांना सारून आजच्या पिढीसाठी क्रिकेट उरलं आहे केवळ एन्टरटेन्मेंट. एन्टरटेन्मेंट. एन्टरटेन्मेंट.
माझ्या समोरच्या माणसाला जेव्हा समजतं की मी क्रिकेट क्षेत्रात पंच किंवा Umpire म्हणून काम करतो, त्यानंतरची पुढची काही सेकंद विलक्षण असतात.क्रिकेट चा चाहता असेल तर त्याच्या डोळ्यात प्रचंड कुतूहल आणि कौतुक दिसू लागतं आणि चेहऱ्यावर डझनभर प्रश्नांची नांदी दिसू लागते. क्रिकेट फारसं आवडतं नसणारी लोक, अर्रे वाह, अच्छा …. असं तोंडदेखलं म्हणतात पण चेहऱ्यावरचा प्रश्न हा अंतू बर्वा मधल्या बापू हेगिष्ट्याला पडला होता तोच असतो. “हा माणूस उपजीविकेसाठी नक्की काय काम करतो?” अगदी कसलेले मुरब्बी पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर सुद्धा, किती पैसे मिळतात हा प्रश्न विचारल्याशिवाय राहात नाहीत. त्यात BCCI म्हणजे रग्गड पैसा मिळत असेल हा एक ठराविक समज असतोच. आमच्या क्षेत्रातील नवखे लोक या प्रश्नांच्या चक्रव्यूहात निष्कारण स्वतःचा अभिमन्यू करून घेतात. आम्ही मात्र आता या प्रश्नांना आता सरावलो आहोत आणि समोरच्या व्यक्तीला त्याच्या पद्धतीत समाधानकारक उत्तर द्यायला शिकलो आहोत. तसं पाहिलं तर समोरचा व्यक्ती काय काम करत असेल याचा अंदाज बांधताना तो क्रिकेट मध्ये पंच असेल हे उत्तर पहिल्या पाच अनपेक्षित उत्तरांमध्ये असू शकतं. त्यामुळेच क्रिकेट मध्ये पंच म्हणून काम करतो म्हणजे नक्की ह्याचं काम काय, आणि यांच्या क्षेत्रात यांच्या आयुष्याचं चित्र नक्की कसं दिसत असेल हे जाणून घ्यायला लोकं फार उत्सुक असतात.
याच काही प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी हा लेखप्रपंच. क्रिकेट पंच म्हणजे आपल्याला मॅचदरम्यान टीव्ही वर दिसणारा, मध्येच काही हातवारे करणारा, खेळाडूंना बाद नाबाद ठरवणारा तोच तो. त्यानंतरचा सर्वसाधारण प्रश्न असतो तो म्हणजे, तुम्ही तर सगळ्या मोठ्या खेळाडूंना भेटत असाल ना? या प्रश्नाचं प्राथमिक उत्तर हो असं असलं तरी एक पंच आणि खेळाडूंचं नातं एवढ्याच तपशिलात संपत नाही.
खरं कसं असतं मैदानावरील पंचाचं आणि खेळाडूंचं नातं ? मैदानावरच्या नात्यापेक्षाही मैदानाबाहेर हे नातं कसं असतं? या लेखात या प्रश्नांवर थोडा प्रकाश टाकायचा प्रयत्न मी करणार आहे. Mutual professional respect हा या नात्याचा मूलभूत आधार असतो.
कोणत्याही पंचाला हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की क्रिकेट हा खेळ खेळ हा मूलतः खेळाडूंसाठी आहे. आम्ही फक्त पडद्यामागचे कलाकार (backstage artist) आहोत. आमचं काम म्हणजे प्रयोग निर्विघ्न पार पडेल एवढंच पाहायचं असतं. हा कलाकार रंगमंचावर आला तर चाक रुळावरून घसरतंय हे लगेच समजतं. तसंच पंच प्रकाशझोतात आले तर फक्त त्यांच्या चुकांमुळे किंवा सामन्याची गाडी रुळावरून घसरल्यामुळेच येतात. मी कायम म्हणतो क्रिकेट मैदानावर पंचाने गाडीच्या shock absorber चं काम करायचं असतं. मूळ इंजिन हे खेळाडूच असतात. खेळाडू आणि पंच यांच्या दरम्यानच्या नात्याला बऱ्याच व्यावसायिक मर्यादा आहेत. त्या उल्लंघून चालत नाहीत. मैदानावर, खेळाडूंशी अति जवळीक असणे योग्य मानलं जात नाही. अर्थात हसत खेळत एकत्र राहण, हलकी फुलकी चेष्टा मस्करी होणं कधीही चांगलंच पण एका मर्यादेपलीकडं ते वाईट दिसतं. ह्याच खेळाडूंसाठी मैदानावर निर्णय घेणाऱ्याची भूमिका आम्हाला पार पाडायची असते. त्यांच्याबरोबर गळ्यात किंवा खांद्यावर हात टाकून उभं राहणं, सतत एखाद्या ठराविक खेळाडूंबरोबर गप्पा गोष्टी करणं, आम्ही कटाक्षाने टाळतो. जे खेळाडू समजूतदार असतात ते सुद्धा या गोष्टीचा आदर करून तसंच वागून सहकार्य करतात. पण पाचही बोटं सारखी कशी असतील? वर्गात समजूतदार मुलांसारखी व्रात्य मुलंही असतात, चापलूस असतात, काही चाणाक्ष, काही बेरकी तर काही निव्वळ ढ असतात. मैदानावरील खेळाडूही असेच असतात. पण शेवटी हे सगळे एकाच वर्गात असल्यामुळे यांना समान न्याय आम्ही देत असतो. पंच आणि पक्षपात हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. सर्वांना न्याय समान असला तरी प्रत्येकाशी सामान वागून चालत नाही.
Player management चा पहिला मूलमंत्र हाच असतो की आपल्या समोरच्या खेळाडूचा स्वभाव समजून घ्या. समजूतदार विद्यार्थी हाताळणं जसे शिक्षकांसाठी सोपे असते तसेच आमच्यासाठीही. बाकी प्रकारच्या खेळाडूंना हाताळताना मात्र बुद्धी, हजरजबाबीपणा, विनोदबुद्धी, संयम, तंत्र, युक्ती, अनुभव आणि वेळेला शासनही वापरावं लागतं. सर्व काही सुरळीत चालू असताना खेळाडूंशी होणारे संवाद हे गप्पा, विचारपूस, मजा, विनोद या प्रकारांमध्ये मोडतात. पण एखाद्या अवघड प्रसंगाची गाठ सोडवताना काळजी घ्यावी लागते. समोरचा खेळाडू चिडलेला, बिथरलेला असू शकतो. त्यामुळे पहिले त्याचं म्हणणं ऐकून घेऊन कुकर मधली वाफ काढण्याचं तंत्र आम्ही वापरतो. त्यानंतरच आपलं म्हणणं मांडलं तर ते समोर नीट पोचतं. नाहीतर शब्दाने शब्द वाढून प्रश्न विकोपाला जातो. बोलण्यातला, शब्दप्रयोगातला आणि देहबोलीतला (body language) संयम अतिशय महत्वाचा.
संघ बदलतात तश्या भाषा बोलण्या वागण्याच्या पद्धतीही बदलतात. मी प्रत्येक भाषेतले काही मूलभूत शब्द शिकून घेतो. ‘नाही’, ‘नको’, ‘हो’, ‘पुरे’, ‘छान’, ‘पाणी’, ‘जेवण’ असे काही शब्द प्रत्येक भाषेत लक्षात ठेवतो. त्या खेळाडूंशी बोलताना त्यांच्या भाषेतले शब्द वापरले की थोडी आपुलकी वाढून सुरुवात चांगली होते. मैदानावर खेळाडूंना त्यांच्या पहिल्या नावाने हाक मारलेलं त्यांना आवडतं. ह्यात दक्षिण भारतात थोडा गोंधळ होतो.मला आठवतं तामिळनाडूच्या माझ्या पहिल्या सामन्यात मी पहिले काही वेळा मुरली विजय ला सवयीप्रमाणे “मुरली” असं हाक मारत होतो. शेवटी त्याने येऊन सांगितलं की माझं नाव “विजय” आहे. माझ्या वडिलांचं नाव मुरली आहे. थोडा हशा पिकला. पण नंतर जेव्हा मी तोच नियम अभिनव मुकुंद ला लावला तर तो म्हणाला माझं नाव “अभिनव” वडिलांचं नाव मुकुंद. मला चक्कर यायचं बाकी होतं. ह्या दक्षिण भारतीय लोकांना नावं एकाच पद्धतीत सोपी सुटसुटीत का ठेवता येत नाहीत देव जाणे. शेवटी दिनेश कार्तिक समोर आल्यावर DK अशी हाक मारून मी माझ्यापुरता तोडगा काढला.
मैदानाबाहेर खेळाडू आणि पंच यांचं नातं कसं असावं याबाबतही काही मर्यादा आहेत. समोरचा खेळाडू अगदी तुमचा लहानपणीचा मित्र असला तरी कामाच्या ठिकाणी चारचौघात उघड मैत्री दाखवता येत नाही. नमस्कार, हाय, हॅलो झाल्यावर संवाद साधायला, गप्पा मारायला किंवा विचारांची देवाणघेवाण करायला काहीच हरकत नसते. एखाद्यावेळेस हॉटेल मध्ये , मॉल्स, सिनेमा हॉल मध्ये भेट झाल्यास गप्पा मारत एकत्र वेळ घालवायला सुद्धा बंदी नसते. पण खेळाडूंबरोबर सामन्याच्या वेळेदरम्यान असे कार्यक्रम ठरवून आखणे मात्र अयोग्य ठरतं. खेळाडूंबरोबर वारंवार एकत्र दिसणं हे व्यवस्थापनाचा रोष देखील ओढवून घेऊ शकतं. खेळाडू आणि पंच या दोघांनी ही आपल्या व्यावसायिक मर्यादांचा आदर ठेवला की हे नातं अजून दृढ होत जातं.
वर्षानुवर्षे खेळाडूंबरोबर एकत्रं काम करून हे नातं नीट जपलं की त्यातून पुढची पायरी असते एकमेकांबद्दल विश्वास निर्माण होणं. हा एकमेकांवरील विश्वास जेव्हा घट्ट असतो तेव्हा मैदानावर कुठल्याही समस्येला तोंड देण्याचं सामर्थ्य मिळतं. एका रणजी सामन्यात मला आठवतं एका मोठ्या खेळाडूविरुद्ध झेलबाद असल्याचं अपील झालं होतं. मी थोडा साशंक होतो आणि नाबाद ठरवणार एवढ्यात तो फलंदाज स्वतःहून परत जाऊ लागला. नंतर मैदानावर आल्यावर मी त्याच्याकडे बघत असताना त्याने माझ्या नजरेतला प्रश्न ओळखला आणि म्हणाला, “मी थांबलो असतो तर तुझा निर्णय चुकला असता. ते मला नको होतं आणि मी बाद होतोच. म्हणून गेलो स्वतःहून. जास्त विचार नको करुस. तुम्ही लोक मन लावून एकाग्रतेने काम करता. एखाद्यावेळेस नाही दिसलं तर चालतं. आमचा प्रत्येक शॉट बॅट च्या मध्यभागी बसतो का? तसंच आहे हे. We should do what the game expects us to do.” त्यानंतर ह्या खेळाडूबद्दलचा माझा विश्वास आणि आदर कित्येकपटीने वाढला. मला नेहेमी वाटतं. खेळाडूंचं मैदानावरील आणि मैदानाबाहेरील वागणं हे त्याच्यावर झालेल्या संस्कारांचं प्रतिबिंब असतं.
पंच हा देखील शेवटी माणूसच आहे. त्याच्याही हातून कधी ना कधी चूक ही होणारच. या गोष्टीचा आदर ठेवून जो खेळाडू मर्यादांचं भान राखतो तो खेळाडू मोठं नाव कमावतो याची भरपूर उदाहरणं आहेत. सचिन तेंडुलकर पासून अजिंक्य राहणे, हाशिम आमला, केन विलियम्सन ते पूर्वीच्या काळचे अनेक दिग्गज हे केवळ उत्तम खेळाडू म्हणून नाही तर उत्तम माणूस म्हणूनही नाव कमावून गेले आहेत. खेळाडूंची वागणूक ही आता पूर्वीइतकी मोठी समस्या उरली नाही आहे. मैदानावरील प्रत्येक हालचाल टिपणाऱ्या कॅमेऱ्यांमुळे असो, किंवा IPL सारख्या स्पर्धांमुळे असो, खेळाडूंच्या वागणुकीमध्ये अत्यंत सकारात्मक बदल गेल्या काही वर्षात बघायला मिळतो आहे. काही अपवाद वगळता खेळाडूंना सामनाधिकाऱ्यांकडून शासन होण्याचे प्रमाण देखील कमी झालं आहे. पंच आणि खेळाडू एकाच ध्येयाने एकत्र काम करताना दिसतात. खेळाडू सामन्यादरम्यान उत्तम सहकार्य करून सामना सुरळीत पार पडायला मदतही करतात. एक प्रकारचा मोळकेपणा आला आहे जो ‘पंच आणि खेळाडू’ या नात्यासाठी अत्यंत स्वागताहार्य आहे.
२०१३ साली मी ऑस्ट्रेलिया मध्ये MCG वर व्हिक्टोरिया विरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या सामन्यात काम करत होतो. या सामन्यात दोन्ही संघात आंतरराष्ट्रीय खेळाडू भरपूर होते व पुढील आठवड्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध च्या कसोटीसाठी तयारी करत होते. मी पाहिलं की मिचेल जॉन्सन माईक हसी ला बॉल टाकल्यानंतर उगाचच डिवचत होता. खूप जवळ जाऊन त्याला चिडवायचे प्रयत्न करत होता. थोडं आक्षेपार्हच वागत होता. मी त्याला थोडं हटकलं आणि शांत राहायला सांगितलं. तो काही बोलला नाही. त्यानंतर हसी मला म्हणाला, “विनीत, त्याला थांबवू नका. मी मुद्दाम त्याला असं वागायला सांगतोय. पुढच्या आठवड्यातला कसोटीमध्ये मला बोथट मिचेल जॉन्सन नकोय. तो माझी एकाग्रता घालवतोय आणि मी तरीही फोकस करायचा प्रयत्न करतोय. दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज हेच करणार आहेत. आम्ही दोघंही तयारी करतोय. आम्ही मर्यादा ओलांडणार नाही. काळजी नको.” ही क्रीडा संस्कृती माझ्यासाठी वेगळी होती.
याच सामन्यात माझा सहकारी पंच पॉल विल्सन याने ख्रिस रॉजर्स ला दोन्ही डावात lbw बाद दिले आणि दोन्ही वेळेस फलंदाजाला निर्णय पटला नव्हता. सामना संपल्यावर आमच्या खोलीचा दरवाजा वाजला. ख्रिस हातात ७-८ बिअरच्या बाटल्या घेऊन आला होता. त्याने खोलीतील सर्वांना देऊ केली आणि पॉलला म्हणाला, “मला तुझी ५ मिनिटे हवी आहेत. दोन्ही lbw निर्णयांबद्दल तुझ्याशी बोलायचे आहे” दोघेही टेबलाच्या विरुद्ध बाजूस बसून आपली बाजू मांडू लागले. यात कुठेही राग, संताप किंवा अनादर नव्हता. मला बिअर वर्ज्य असल्यामुळे मी मूक प्रेक्षक बनून हे बघत होतो. ५ मिनिटांच्या वैचारिक देवाणघेवाणीनंतर दोघांनाही एकमेकांचे म्हणणे पटले नव्हते. पण विषय तिथेच संपवल्याचे समाधान होते. हे सगळं बघून, आपल्या इथेसुद्धा अश्या सकारात्मक वृत्ती तयार झाल्या तर किती बरं होईल असं मला वाटलं होतं.
आज २०२२ मध्ये मला सांगताना खूप आनंद होतो की आता आपल्या इथेही बहुतांशी खेळाडू इतक्याच सकारात्मक वृत्त्तीने खेळतात आणि वागतात.खेळाडू आणि पंचांचं, आदर आणि विश्वासाचं नातं उत्तरोत्तर दृढ होत जाणार यात मला थोडी सुद्धा शंका नाही.
तर हा लेख वाचल्यावर, “तुम्ही तर सगळ्या खेळाडूंसोबत फोटो काढले असतील ना”? “तुम्ही तर सारखे सगळ्या खेळाडूंबरोबर रहात असाल ना “? हे प्रश्न तुम्हाला पडू नयेत एवढीच इच्छा व्यक्त करतो, आणि यावेळेसपूर्ती आपली रजा घेतो.
मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की मी क्रिकेट सारख्या खेळात काही नाव कमावू शकलो. क्रिकेट ह्या खेळाने मला बरंच काही दिलंय. माझ्या वयाची ८-१० वर्षे मी महाराष्ट्रासाठी क्रिकेट खेळलो. पण जेंव्हा मी डोमेस्टिक क्रिकेट खेळताना रणजी ट्रॉफी किंवा इतर काही सामने खेळायचो तेव्हा सामनाधिकारी (मॅच रेफरी ) ह्या माणसाशी फारसा संबंध कधी आला नाही. त्यावेळी हे पद म्हणजे फक्त निरीक्षकाची भूमिका बजावणारी एक व्यक्ती बसवली आहे अशीच ओळख असायची. गेला काही काळ मी बीसीसीआय साठी सामानाधिकारी म्हणून काम करतो आहे. अश्यावेळी खऱ्या अर्थाने मला ह्या पदाची जाणीव होत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
मला वाटतं भारतीय क्रिकेटमध्ये सामनाधिकारी ह्या पदाकडे पाहण्याचा दृष्टिकोन साधारणपणे २०१० साला नंतर बदलला असे म्हणायला हरकत नाही. भारतामधून अनेक पंच आयसीसी (इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिल) च्या पॅनल वर पाठवण्यास सुरुवात झालीच होती. आणि त्याच सुमारास सामनाधिकारी म्हणून आयसीसी (इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल) च्या नियमावलीनुसार पार पाडावी लागणारी जबाबदारी आणि त्या नियमावलींशी संलग्नता साधायची प्रक्रिया आपल्या इथेही सुरु झाली. ह्या संपूर्ण प्रक्रियेसाठी सायमन टॉफेल सारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय पंचाची सल्लागार पदी नेमणूक केली गेली होती. त्याच सुमारास भारतीय क्रिकेटमध्ये तांत्रिकदृष्ट्या अनेक महत्वाचे बदल पाहायला मिळत होते. भारतामधील अंतर्गत सामन्यांमधील पंचांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी सामन्यानंतर व्हिडिओ पाहण्याची सोय उपलब्ध होऊ लागली. तांत्रिकदृष्ट्या इतरही काही बदल घडवण्यामध्ये स्टॅन्ली सलढाना (महाराष्ट्राचे माजी रणजीपटू) ह्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी बनवलेल्या ‘मॅच ऍनालिसिस सॉफ्टवेअर’ चा वापर अंतर्गत क्रिकेट सामन्यांमध्ये सुरु झाला. मैदानावर कॅमेरे लागण्यास सुरुवात झाली. यामुळे पंचांच्या कामगिरीचे मूल्यांकन अधिक चांगल्या पद्धतीने होऊ लागले.
२०१४ पर्यंत आपल्या अंतर्गत सामन्यांमधे ‘स्टेट असोसिएशन; मुख्यतः माजी खेळाडूंची सामनाधिकारी किंवा निरीक्षक म्हणून निवड करीत असत. सायमन टॉफेल ह्यांनी सामनाधिकारी निवड प्रक्रियेमध्ये एक आमूलाग्र बदल घडवून आणला. त्यांनी तत्कालीन सामनाधिकारी आणि नवीन होतकरू सामनाधिकारी यांच्यासाठी एका परीक्षेचे आयोजन केले होते. तब्बल २ तास चालणाऱ्या या परीक्षेची प्रमुख अट म्हणजे ती व्यक्ती माजी रणजी खेळाडू हवी. त्या व्यक्तीने किमान २५ रणजी सामने खेळलेले असायला हवेत आणि निवृत्त होऊन ५ वर्षे झालेली असावीत. या परीक्षेसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ने माझे नाव सुचवले आणि मी परीक्षा आणि त्यासाठी आयोजित केलेले वर्कशॉप (कार्यशाळा) ह्यामध्ये सहभागी झालो. त्या वातावरणात पाय ठेवल्यापासूनच आम्हा सर्वांचे मूल्यांकन होण्यास सुरुवात झाली. गमतीची गोष्ट म्हणजे हे आम्हाला नंतर समजलं. आमच्या छोट्या छोट्या गोष्टींवर बारीक नजर ठेवली जायची. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा एखाद्याचा दृष्टीकोण कसा आहे, अवघड परिस्थिती हाताळायची क्षमता कशी आहे. कोण काय पद्धतीने इतरांशी संवाद साधत आहे (सामनाधिकारी म्हणून संवाद कौशल्य हा अतिशय महत्वाचा गुण आहे.) परीक्षार्थीला नियमांची माहिती आहे का. अशा अनेक गोष्टींकडे लक्ष ठेवले जायचे.
खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर ही गोष्ट करावी असा फारसा विचार केला नव्हता कारण त्याकाळी पंचांना जास्त महत्व असे. तुम्हाला जर सर्वोच्च स्तरावर हे पद मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्ही आंतरराष्ट्रीय सामने खेळले असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्या पदावर पोचणे अतिशय जिकिरीचे काम आहे. पण जेव्हा एमसीए ने माझे नाव सुचवले तेव्हा सुनील गुदगे, श्याम ओक, नीलिमा जोगळेकर यांच्यासारख्या अनुभवी लोकांचे लाभलेले मार्गदर्शन माझ्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरले. ह्यामध्ये माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे ज्या खेळावर आपले प्रेम आहे त्या खेळाशी निगडीत असलेले काम करायला मिळणे आणि दुधात साखर म्हणजे मान असलेले पद मिळणे. आपण ज्या खेळासाठी इतकी मेहनत घेतली आहे त्याचे फळ चाखण्याचा आनंद काही औरच. जसे प्रत्येक क्षेत्रामध्ये आव्हाने असतात तसेच सामनाधिकारी ही भूमिका देखील कठीणच. इथेही सातत्याने आमचे मूल्यमापन होत असते. सामान्य क्रिकेटप्रेमींच्या नजरेतला सामनाधिकारी म्हणजे मैदानावरच्या घडामोडींवर लक्ष ठेवणारा आणि नाणेफेकी च्या वेळी हजेरी लावणारा माणूस… ! पण प्रत्यक्षात सामानाधिकारी म्हणजे सामना सुरु होण्याआधी आणि सामना संपल्यानंतर मैदानाबाहेर घडणाऱ्या गोष्टींचे व्यवस्थापन करणारी व्यक्ती. उदाहरणच द्यायचे झाले तर, पंचांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे आहे का? सर्व सुविधा बीसीसीआयने नमूद केलेल्या नियमांना धरून आहेत का? स्टेट असोसिएशनने दिलेल्या त्यांच्या संघाच्या खेळाडूंच्या यादीची पडताळणी करणे, स्टेट असोसिएशनने खेळाडूंना पुरवलेल्या सुविधांवर देखरेख ठेऊन त्यावर रिपोर्ट बनवणे. असे प्रत्येक सामन्यागणिक आम्हाला तब्बल आठ-नऊ वेगवेगळे रिपोर्ट्स बनवावे लागतात. त्याचबरोबर खेळपट्टी कशा प्रकारची होती? बाउन्स किती होता? आऊटफिल्डचा दर्जा कसा होता? खेळाडूंना दिले जाणारे जेवण, संघाला दिली जाणारी ट्रान्सपोर्टची सुविधा, महिला खेळाडूंना मिळत असलेल्या सुविधा ह्या सर्व गोष्टी बीसीसीआयच्या मापदंडाला धरून आहेत का? यामध्ये काही कमतरता आढळली तर सामनाधिकारी म्हणून स्टेट असोसिएशनच्या सचिवांबरोबर चर्चा करून प्रश्न सोडवावे लागतात. हल्ली खेळामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधी नियम खूप कडक आहेत. ते सर्व नियम पाळले जात आहेत ना याची देखील चाचपणी करण्याची जबाबदारी नेमून दिलेल्या भ्रष्टाचारविरोधी अधिकाऱ्याची असते खरी, पण या सर्व गोष्टींचा अहवाल हा शेवटी सामनाधिकाऱ्याकडेच येत असतो. छडी नसलेला हेडमास्तरच म्हणा हवं तर!!
सामानाधिकारी म्हणून आमची खरी धावपळ म्हणाल तर ती सुरु होते सामना सुरु होण्याचा दोन दिवस आधी. ह्या वेळी सामन्याचे पंच, सामनाधिकारी, भ्रष्टाचारविरोधी अधिकारी आणि दोन्ही संघाचे कप्तान ह्यांच्यामध्ये एक मिटिंग होते. ह्या मिटिंगचा उद्देश एवढाच की संघ कप्तानांना आणि इतर अधिकाऱ्यांना सामन्यासाठी काय काय सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती पुरवणे हा असतो . दोन्ही संघानी ‘स्पिरिट ऑफ द गेम’ ह्या संकल्पनेला धरून खेळण्यासाठी प्रेरणा देणे महत्वाचे असते. विशेषतः ही मिटिंग म्हणजे सामानाधिकाऱ्यासाठी दोन्ही संघांच्या कप्तानांशी संवाद साधण्याची आणि चांगले संबंध प्रस्थापित करण्याची नामी संधी असते. आणि इथे आमचे संवादकौशल्य अतिशय महत्वाचे ठरते. इथे एक अभिमानाची गोष्ट सांगायची म्हणजे आपले क्रिकेट बोर्ड हे जगातील एकमेव बोर्ड आहे ज्यांनी अंतर्गत सामन्यांसाठी सुद्धा मैदानावर ६-६ कॅमेरे बसवले आहेत. व्हिडीओ अनॅलिस्टच्या मदतीने सर्व कॅमेरे योग्य त्या जागी आणि योग्य त्या कोनात (अँगल्स) मध्ये बसवले आहेत किंवा नाही ह्याची खात्री करावी लागते. ह्या कॅमेऱ्यांचा उपयोग सामन्याच्या प्रत्येक महत्वाच्या क्षणांचे विश्लेषण करताना होतो. थोडक्यात सांगायचे तर अनेक कलाकार एक सामना पार पाडण्यासाठी अथक श्रम घेत असतात आणि ते कलाकार त्यांची कामे चोख बजावत आहेत ना ह्याची जबाबदारी येते सामानाधिकाऱ्याकडे असते. बरेचदा सामन्याचे ठिकाण, तिथले हवामान इत्यादी गोष्टी विचारात घेऊन सुद्धा काही निर्णय घ्यावे लागतात. उदाहरणार्थ, भारताच्या पूर्व भागात हिवाळ्यात सामना असेल तर तिथे सूर्यास्त लवकर होत असल्याने सामना थोडा लवकर सुरु करावा लागतो. उद्दिष्ठ एकच, “खेळ सुरळीत पार पाडणे, खेळ आणि खेळाडूंना जास्तीत जास्त वेळ मिळून सामन्याचा निकाल लागणे”.
बरं सामनाधिकाऱ्याला एवढ्याच गोष्टींकडे लक्ष्य द्यावे लागते का? तर नाही !! खरी कसरत असते ती म्हणजे सामना ‘कोड ऑफ कंडक्ट’ ला अनुसरून सुरु आहे ना ह्यावर नजर ठेवणे. पण स्पर्धात्मक खेळ म्हणल्यावर खेळाडूंचे गैरवर्तन, वादविवाद अश्या अनेक गोष्टी घडत असतात. ह्याला “आपण हिट ऑफ द मोमेन्ट” म्हणतो. तसेच षटकांची कमी गती, जोरदार अपील करणे (Excessive Appealing), मैदानावरील अतिआक्रमकता अश्या प्रकारच्या अनेक नियमबाह्य कृती घडतात आणि सामनाधिकारी म्हणून नियमानुसार खेळाडू आणि कप्तान ह्यांच्याकडून दंड आकारावे लागतात. असे निर्णय घेताना खेळाडूंबद्दल असलेली माहिती खूप महत्वाची असते. काही खेळाडू जात्याच खट्याळ असतात, त्यांना नीट हाताळावे लागते. अश्यावेळी आपल्या गाठीशी असलेला क्रिकेटचा अनुभव प्रचंड कामी येतो. एखाद्या खेळाडूने काही नियमबाह्य कृती केली असेल तर खेळाडूच्या गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार किती दंड भरावा लागेल ह्याची माहिती खेळाडूला द्यावी लागते. खेळाडूने चूक कबूल केली तर उत्तमच पण बरेचदा खेळाडू आपण केलेली कृती ही चुकीची आहे हे मान्य करत नाहीत. खेळाडू स्वतःची बाजू मांडतो, सामनाधिकारी त्याच्याकडे उपलब्ध असलेले व्हिडिओ पुरावे म्हणून सादर करतो आणि जणू काही कोर्टात खटला भरला आहे असे वातावरण निर्माण होते. म्हणूनच मघाशी म्हणल्याप्रमाणे खेळाडूंशीच जर आपण चांगले संबंध प्रस्थापित केले तर खेळाडू सुद्धा पंचांना आणि अधिकाऱ्यांना मान देतात. अशावेळी मैदानावरील आणि बाहेरील अनेक सहज सुटतात आणि ह्या सगळ्यांचीच मदत सामना सुरळीत पार पडण्यास नक्कीच होते. एक खेळाडू, खेळ प्रेमी आणि सामानाधिकारी म्हणून एकमेकांबद्दल आणि खेळाप्रती आदर निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे.
सामना संपला म्हणजे जबाबदारी संपली असे होते का? तर नाही. बरेचदा खुपश्या गोष्टी मैदानावर न ताणता मिटवल्या जातात आणि त्यात पंचांचाही सिंहाचा वाटा असतो. पण कधी कधी एखादा खेळाडू मैदानाबाहेर (ऑफ द फिल्ड) काही वादग्रस्त वक्तव्य करतो तेव्हा सुद्धा आम्हाला त्या खेळाडूवर नियमानुसार कारवाई करावी लागते. आजकाल सोशल मीडिया वर अनेक गोष्टी सांगितल्या जातात आणि त्यात जर एखाद्या खेळाडूने वादास तोंड फुटेल असे काही वक्तव्य केले असेल तर तिथे सुद्धा आम्हाला मध्यस्थी करावी लागते. खूप छोटे छोटे नियम असतात आणि मैदानावर किंवा मैदानाबाहेर होणाऱ्या प्रत्येक घटनेवर आम्हाला करडी नजर ठेवावी लागते. खूप छोट्या गोष्टींकडे बारकाईने पाहावे लागते. कधी एखाद्या सामन्याच्या वेळी तिसरा अंपायर नसेल तर तो रोल सुद्धा आम्हालाच पार पाडावा लागतो.
आता तुम्ही विचाराल की ह्या सगळ्या गोंधळात पंचांचे मूल्यमापन कसे होते? ह्यामध्येही प्रचंड स्पर्धा आहे.आम्हाला पंचांबद्दल सुद्धा एक रिपोर्ट बनवावा लागतो. त्यात बारीक सारीक तपशील लिहावे लागतात कोणत्या क्षणी पंचाने कोणता निर्णय घेतला? तो निर्णय कसा घेतला? त्या क्षणाचे व्हिडीओ जोडावे लागतात. विद्यार्थ्यांना शाळेत जसे परीक्षेत गुण दिले जातात त्याप्रमाणे वेगवेगळ्या मापदंडानुसार पंचांना सुद्धा ग्रेड्स दिल्या जातात. त्यानुसार कोणत्या पंचाला बढती द्यायची हे प्रत्येक सिझनच्या शेवटी ठरवले जाते. एवढेच नाही तर सामानाधिकाऱ्याच्या कामाचे देखील मूल्यांकन केले जाते. आमच्याबद्दलचे रिपोर्ट्स आणि इतर अधिकाऱ्यांनी (पंच, अनॅलिस्ट इत्यादी) दिलेला फीडबॅक आमचे गुण ठरवतो. सामनाधिकारी म्हणून सॉफ्ट स्किल्स आणि आचरणाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याच धर्तीवर बरेचदा स्टेट असोसिएशनचे सदस्य आमचा परफॉर्मन्स रिपोर्ट बीसीसीआयकडे पाठवतात. दर वर्षी आमच्यासाठी एक कार्यशाळा (वर्कशॉप) आयोजित केले जाते. इथे आम्हाला नियमांमधले बदल सांगितले जातात. वेगवेगळ्या गोष्टी, त्या त्या वेळेची परिस्थिती कश्या प्रकारे हाताळावी ह्याबद्दल प्रशिक्षण दिले जाते. आपल्या देशात आत्ताच्या घडीला साधारणपणे ७०-७२ सामनाधिकारी कार्यरत असतील. प्रत्येकाला वेगवेगळ्या स्तरावरील क्रिकेट सामन्यात भूमिका पार पाडावी लागते. अगदी १६ वर्षांखालील क्रिकेट सामन्यांपासून ते देशातील सर्वोच्च, म्हणजेच रणजी ट्रॉफी सामान्यांपर्यंत वेगवेगळ्या स्तरांवर सामानाधिकारी म्हणून काम करावे लागते. बीसीसीआय मार्फत पार पाडली जाणारी ही प्रोसेस अतिशय प्रोफेशनल आहे.
आता थोडेसे वेगळ्या विषयावर बोलायचे झाले तर सामनाधिकारी म्हणून सात वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये वेगवेगळे अनुभव आले. तसे पाहायला गेलो तर वाईट अनुभव नाहीच असे म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे उत्तम व्यवस्थापन. पण काही आव्हाने नक्कीच उभी राहतात. विशेषतः जर एखादा सामना जर छोट्या जिल्ह्यात किंवा शहरात आयोजित केला असेल तर ती आव्हाने अधिक जाणवतात. कारण तिथल्या व्यवस्थापनाला नियम, मापदंड याची फारशी माहिती नसते पण त्यांची खेळाप्रती असलेली भावना आणि आवड नक्कीच वाखाणण्याजोगी असते. त्यांच्या छोट्या गावात सामना आयोजित झाला आहे हीच त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बाब असते. प्रेक्षकांची संख्याही तुफान असते. त्यामुळे सर्व लोक जीव ओतून परिश्रम करत असतात.
असाच एक गमतीशीर आणि कायम लक्षात राहणारा किस्सा मला आठवतोय. ओडिसा मध्ये बोलांगिर नावाचा एक छोटा जिल्हा आहे. तिथे एकदा एक सामना आयोजित करण्यात आला होता. आपल्याकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये अशी पद्धत आहे की खेळाडूंना मॅच फी म्हणून रोख रक्कम दिली जाते जेणेकरून त्यांना ते पैसे लगेच वापरता यावेत. पण सामन्याचा दिवस अगदी तोंडावर आला असताना आपल्या देशात नोटबंदी (डिमॉनिटायझेशन) घोषित झाली. आता झाली का पंचाईत !! खेळाडूंना रोख रक्कम कशी द्यायची हा यक्षप्रश्न उभा राहिला. पण तिथल्या असोसिएशनचे प्रमुख हे अतिशय उत्साही आणि जिद्दी व्यक्तिमत्व. त्यांनी धडपड करून कलेक्टरला भेटून नवीन चलनी नोटा मिळवल्या आणि सामना सुरळीत पार पाडला.
असेच एकदा गुवाहाटीला एक सामना होता आणि नेमके त्याचवेळी तिथे दंगली उसळल्या. अशा प्रसंगी सामना सुरळीत पार पडणे हे मोठे आव्हान असते. त्यासाठी बरीच धावपळ करावी लागली. खेळाडूंची सुरक्षितता लक्षात घेऊन स्टेट असोशिअन, बीसीसीआय, स्थानिक पोलीस यांच्यामध्ये सातत्याने समन्वय साधून सामना निर्विघ्नपणे आणि कोणत्याही प्रकारची सनसनाटी बातमी होऊ न देता पार पाडला गेला.
हल्ली अंतर्गत स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये बरेचदा आयपीएल खेळलेले आणि स्वतःचे स्थान निर्माण केलेले खेळाडू भेटतात. त्यांची देहबोली,वागणे-बोलणे, त्यांचा दर्जा, त्यांचे वेगळेपण, त्यांची आक्रमकता पाहताना अनेक गोष्टी शिकायला मिळतात. तरुण खेळाडूंमध्ये आणि पर्यायाने क्रिकेटमध्ये सुद्धा होत असलेले बदल जवळून अनुभवता येतात. सामानाधिकार्यासाठी अजून एक गोष्ट खूप महत्वाची असते मैदानावर असलेल्या खेळाडूंमधील प्रतिभा ओळखणे, आणि बीसीसीआयकडे त्याचा योग्य रिपोर्ट देणे. मला देखील अश्याच काही गुणी खेळाडूंबद्दल रिपोर्ट देण्याची संधी मिळाली, पुढे असे खेळाडू मोठ्या स्तरांवर चमकतात तेंव्हा मनाला नक्कीच समाधान वाटते. अश्यावेळी स्वतः क्रिकेट खेळण्याचा अनुभव अत्यंत उपयोगी पडतो.
अजून मनाला समाधान देणारी गोष्ट म्हणजे महिला क्रिकेटला आता दिला जाणारा मान आणि प्राधान्य. आज जगभर महिला क्रिकेट ज्या पद्धतीने खेळले जाते, त्यामध्ये सर्वच क्रिकेट असोसिएशनचा महत्वाचा वाटा आहे. नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ खेळांमध्ये क्रिकेट सामन्यात सामनाधिकारी म्हणून महिलांनीच महत्वाची भूमिका पार पाडली. महिला क्रिकेटच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची आणि अभिनमानाची गोष्ट आहे.
कधी कधी मला माझे क्रिकेट खेळायचे दिवस आठवतात. मी १९९६ साली महाराष्ट्रासाठी खेळायला सुरु केले. तेव्हाचे क्रिकेट आणि आत्ताचे क्रिकेट ह्यात जमीन आस्मानाचा फरक आहे. तेव्हा माझा क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टीकोण फक्त खेळाडू म्हणून होता. जसे खेळाचे अनेक भाग आहेत तसेच पंच आणि सामनाधिकारी सुद्धा एक भागच आहेत एवढाच माझा विचार असायचा. बरेचदा आपण आपल्या धुंदीत जमिनीवर चालत असतो आणि आपल्याला सभोवतालच्या गोष्टी नीट दिसत नाही किंवा आपण त्याकडे नकळत दुर्लक्ष करतो. पण आकाशात गवसणी घालणारा गरुड जमिनीवरची छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा आपल्या डोळ्याने अचूक टिपतो. अगदी साध्या शब्दात सांगायचे तर सामानाधिकारी ह्या पदाने मला क्रिकेटकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोण दिला, अगदी Birds eye view. मी जेंव्हा खेळाडू म्हणून मैदानावर असे तेंव्हा खेळताना काही सुविधा उपलब्ध नसतील तर अगदी सहजतेने त्या गोष्टीची तक्रार करीत असे, पण त्या सुविधा उपलब्ध करून देण्यामागे किती बारीक गोष्टींचा विचार आणि परिश्रम आहेत याची जाणीव ह्या पदामुळे झाली. एका सामन्यामागे किती वेगवेगळ्या व्यक्ती झटत असतात तेही लक्षात आले. कदाचित त्यामुळेच सामन्यासाठी आलेल्या सर्वच घटकांना सर्व सुविधा मिळाव्यात ह्यासाठी मी दक्ष राहून दुप्पट प्रयत्न करतो. आधी खेळाडू म्हणून पंचांबद्दल आदर तर होताच पण सामनाधिकारी या पदावरून त्यांचे काम आणि मेहनत पाहून त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित झाला आहे. पंच, व्हिडीओ ऍनालिस्ट, बीसीसीआयचे सिनियर आणि ज्युनियर ऍनालिस्ट आणि पडद्यामागचे इतर अनेक कलाकार यांचे योगदान किती अमूल्य आहे हे प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे ह्या सर्वांबरोबर काम करताना माझा मनात नेहमी संघभावना असते.
आमचे एक ज्येष्ठ सामनाधिकारी नेहमी सांगतात – If you are not noticed by people and nobody is talking about you, then, as a match referee you are doing a fantastic job!! मला वाटतं सामनाधिकारी म्हणजे काय आहे हे सांगण्यासाठी एवढी एकाच ओळ पुरेशी आहे.