ball

A letter In the Shadows of Defeat

Dear Cricket Family,

I trust this letter finds you wrapped in the echoes of the recent ICC Men’s Cricket World Cup 2023 final—an event that unfolded like a mesmerizing symphony of emotions, leaving an indelible mark on the canvas of our shared cricketing passion. As we come together to reflect on this experience, I invite you to join me in exploring the ebbs and flows, the highs and lows and the emotional crescendo that encapsulated our journey alongside the Indian cricket team.

The aftermath of the final still lingers and the heartbreak is palpable. It’s a bittersweet concoction of jubilant cheers and silent tears, a demonstration of the profound impact cricket has on our lives. Every four struck, every six soared and every wicket fell, creating ripples that resonated with the very soul of our cricket-loving hearts. The tearful response of that young fan in a poignant video mirrors the raw, unfiltered emotions that bind us together as a diverse community of cricket enthusiasts, transcending age, ethnicity and background.

Australia’s triumphant comeback in the final, orchestrated by the brilliance of Travis Head and the match-winning partnership with Marnus Labuschagne, evokes a complex concoction of admiration and sorrow. Despite our team’s stellar 10-match winning streak leading up to the final, the haunting echoes of India’s 2003 World Cup loss to Australia persist, reminding us of cricket’s capricious nature—a potent blend of exhilarating victories and agonizing defeats.

In extending our heartfelt appreciation to our cricketing heroes, from seasoned campaigners like Rohit Sharma and Virat Kohli to rising stars like Mohammed Siraj and Shubman Gill, we must acknowledge the depth of passion and commitment that permeated every corner of the cricketing arena.

However, let us not be confined by the momentary sting of defeat. Instead, let’s delve into the philosophical realm of cricket, where winning and losing are mere waypoints in a grander narrative. Cricket, like life, is transient. It weaves its textile with victories and defeats, triumphs and tribulations. This defeat, as poignant as it may feel now, is but a fleeting moment in the grand embroidery of our cricketing journey.

The beauty of cricket lies not solely in the final scorecard but in the spirit that binds us together as a global cricketing community. The unpredictable twists, the thrill of the game and the camaraderie it fosters among fans from diverse backgrounds are what make this sport truly beautiful.

In the resounding words, “Dhoni finishes off in style!” let us not forget that cricket is more than just a series of outcomes—it’s a celebration of the game itself, the shared joy and the enduring bonds it creates among fans.

As we navigate through the waves of emotions, remember that this, too, shall pass. Cricket, with its inherent uncertainties, will continue to enthral us and our resilient team will rise again. Thank you for being an integral part of this emotional rollercoaster, and here’s to the enduring spirit of cricket that unites us all—celebrating the shared joy and enduring bonds it creates among fans.

With heartfelt emotions and unwavering passion,

A Cricket Enthusiast

क्रिकेटवाली दिवाळी 

२०२३ ची विश्वचषक स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. टी-२० क्रिकेट आणि फ्रँचाइज क्रिकेटचं प्रस्थ कितीही बोकाळलं तरी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाची मजा काही औरच आहे. यंदाचा हा तेरावा विश्वचषक, आणि भारतात होणार चौथा. आधी आपण ३ वेळा (१९८७, १९९६ आणि २०११) मध्ये विश्वचषक आयोजित केला आहे. यावेळी ही स्पर्धा पूर्णपणे भारतात होणार आहे. भारतातील १० शहरे सामन्यांसाठी सज्ज आहेत, आणि आता सगळे संघ देखील भारतात दाखल झाले आहेत. ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याने स्पर्धेची सुरुवात होईल आणि १९ नोव्हेंबर रोजी आपल्याला या स्पर्धेचा विजेता समजेल. ही स्पर्धा तब्बल ६ आठवडे चालणार आहे. जगातील १० सर्वोत्कृष्ट देश या स्पर्धेत भाग घेतील, एकूण ४८ सामन्यानंतर आपल्याला नवीन विश्वविजेता मिळेल. २०१९ च्या विश्वचषकात इंग्लंडने पहिल्यांदा या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. ज्या देशाने जगाला क्रिकेट दिले, त्यांना एकदिवसीय स्पर्धेच्या विजेतेपदासाठी ५० पेक्षा जास्त वर्षे वाट बघावी लागली. आजपर्यंत झालेल्या स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाने ५ वेळा, भारत आणि वेस्टइंडीजने २ वेळा तर पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंडने प्रत्येकी एकदा हा विश्वचषक जिंकला आहे. या स्पर्धेसाठी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे २ वेळचे विजेते वेस्टइंडीज २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत खेळणार नाहीत. त्यांना या स्पर्धेसाठी पात्रता फेरी खेळावी लागली आणि ते त्या फेरीतून बाद झाल्यामुळे मुख्य स्पर्धेत खेळणार नाहीत. 


२०२३ च्या स्पर्धेत १० संघ आहेत, जे प्रत्येक संघाविरुद्ध एक सामना खेळतील. त्यानंतर सर्वोत्कृष्ट ४ संघांमध्ये उपांत्य सामने होतील, त्यातून अंतिम सामना खेळवला जाईल आणि आपल्याला नवीन विजेता मिळेल. आयसीसीने ठरवलेला हा स्पर्धेचा फॉरमॅट खरोखर चांगला आहे. सर्वप्रथम १९९२ साली या फॉरमॅटमध्ये सामने खेळवले गेले होते, आणि त्यानंतर २०१९ ची स्पर्धा देखील अशीच खेळवली गेली. या फॉरमॅटमुळे प्रत्येक संघाला एकमेकांविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेतील काही सामन्यांकडे सर्वांचीच नजर असणार आहे. या यादीतील पहिला सामना म्हणजे अर्थातच भारत विरुद्ध पाकिस्तान. हे दोन्ही संघ आता फक्त आयसीसी ट्रॉफीमध्येच खेळताना दिसतात. १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होणारा हा सामना आधीच हाऊसफूल झाला आहे यात काही वाद नाही. या सामन्याची तिकिटे काही पटींनी विकली जात आहेत, अहमदाबादची हॉटेल्सच नाही तर हॉस्पिटल्स, धर्मशाळा इत्यादी ठिकाणे देखील पूर्णपणे भरली आहेत अशा बातम्या येत आहेत. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम पूर्णपणे भरून जाईल, लाखो लोक मैदानावर आणि जगभरातून कित्येक कोटी लोक टीव्हीवर या सामन्याचा आनंद घेतील यात काही शंका नाही. तशीच काही हालत भारताच्या बहुसंख्य सामन्यांची असेल. भारतीय संघाला घरच्या मैदानावर, तेही विश्वचषकात खेळताना बघणं आपल्या भारतीयांना नक्कीच आवडेल. भारताचे सामने देखील बहुतेक सर्व शहरांमध्ये – हैदराबाद वगळता, आयोजित केले गेले आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे संघ क्रिकेट रसिकांचे हॉट फेव्हरेट असतील, त्यामुळे त्यांचे सामने बघण्यासाठी रसिकांची गर्दी होईल यात शंका नाही. स्पर्धेचा पहिलाच सामना – इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, तसेच इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान हे सामने देखील चुरशीचे होतील अशी अपेक्षा आहे. 

Rohit Sharma of India with The ICC Men’s Cricket World Cup Trophy at the Hilton Barbados Resort, Needham’s Point Saint Michael, July 28, 2023.

क्रिककथा दिवाळी अंकासाठी बुकिंग सुरु झालं आहे. लेख वाचता आहातच, पटकन बुकिंग पण करून टाका…. 
https://crickatha.com/shop/

स्पर्धेतील काही संघ – अफगाणिस्तान, नेदरलँड्स, बांगलादेश आणि श्रीलंका, यांची स्पर्धा जिंकण्याची शक्यता तशी कमी आहे. श्रीलंका वगळता इतर संघ फारसे प्रभावी ठरतील अशी शक्यता देखील नाही, पण प्रसंगी कोणत्याही संघाला हरवण्याची ताकद या संघांमध्ये आहे. एखाद्या संघाची लय बिघडण्याचे काम हे नक्की करू शकतात. श्रीलंकेकडे संभाव्य विजेते म्हणून बघणे थोडे अवघड आहे, पण नशिबाची साथ असेल तर ते उपांत्य फेरीपर्यंत नक्की जाऊ शकतील. पाकिस्तानचा संघ कोणत्याही आयसीसी स्पर्धेत कायमच धोकादायक असतो. त्यांची कामगिरी दर आठवड्याला येणाऱ्या नवीन बॉलिवूडच्या चित्रपटासारखी असते. कोणता चित्रपट गल्ला जमवेल (आणि काय कारणामुळे जमवेल) हे सांगणे जसे अवघड आहे, तसेच पाकिस्तानची कामगिरी कशी होईल, ते हिट ठरतील का फ्लॉप होतील हे सांगणे देखील सोपे नाही. नुकत्याच झालेल्या आशिया कप स्पर्धेत ते भारताकडून पराभूत झाल्यानंतर त्यांचे मनोधैर्य देखील कमी असेल. अशावेळी चांगली कामगिरी करून संघाला विजेतेपदाच्या शर्यतीत नेणे हे संघ व्यवस्थापनासाठी महत्वाचे असेल. तशीच काहीशी गत दक्षिण आफ्रिकेची आहे. फरक इतकाच की आफ्रिकेचा संघ मोक्याच्या क्षणी भरात आला आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्यांनी लक्षणीय विजय मिळवला आहे, त्यामुळे क्रिकेट जगताच्या नजर त्यांच्याकडे आहेतच. अर्थात आयसीसी ट्रॉफी आणि दक्षिण आफ्रिका हे विळ्याभोपळ्याचे नाते आहे. आफ्रिकेचा संघ मोक्याच्या क्षणी आयसीसी ट्रॉफीमध्ये मार खातो हा आजवरचा अनुभव आहे. पण तरीही या संघावर नक्कीच लक्ष असेल. 

गेल्या स्पर्धेत अंतिम फेरीत खेळलेले दोन संघ – इंग्लंड आणि न्यूझीलंड हे नक्कीच फेव्हरेट असतील. इंग्लंडने गेल्या काही वर्षात आपला खेळाचा दर्जा चांगलाच उंचावला आहे. ‘बाझबॉल’ पद्धतीचे क्रिकेट खेळताना ते प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. २०१९ विश्वचषकानंतर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने संघ उभारणी केली आहे. सलग दुसरे विजेतेपद मिळवण्यासाठी ते नक्कीच उत्सुक असतील. त्यांच्या २०१९ च्या विजेतेपदाचा नशिबाचे गालबोट होते, ते झटकून आता विजय मिळवणे त्यांच्यासाठी महत्वाचे असेल. या नवीन संघात तशी ऊर्जा आणि इच्छाशक्ती आहे, त्यामुळे हा संघ धोकादायक ठरू शकतो. न्यूझीलंडचा संघ देखील तितकाच धोकादायक आहे. हा संघ म्हणजे कोणताही गाजावाजा न करता शांतपणे आपला खेळ करणारा आहे, आणि कदाचित त्यामुळेच तो क्रिकेट रसिकांचा आवडता संघ आहे. गेल्या दोन विश्वचषक स्पर्धेतले (२०१५ आणि २०१९) ते उपविजेते आहेत. आता या स्पर्धेत तो एक मोठा अडथळा पार पाडणे हेच त्यांचे लक्ष असेल. संघातील प्रमुख खेळाडूंनी योग्य कामगिरी केल्यास हा संघ अंतिम ४ मध्ये नक्की असेल, किंबहुना असावा असे क्रिकेट रसिकांची इच्छा आहे. 
ऑस्ट्रेलियन संघ आयसीसी स्पर्धेत नेहमीच चांगला खेळतो. किंबहुना आयसीसी स्पर्धेत त्यांचा खेळ कायम ऊंचावतो. ऑस्ट्रेलियन संघ कायमच प्रोफेशनल पद्धतीने मैदानावर खेळतो आणि प्रतिस्पर्धी संघाला वरचढ होण्याची संधी देत नाही. आक्रमकता हेच त्यांचे प्रमुख अस्त्र असते. नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या मालिकेत त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला तरी देखील त्यांना हलके घेणे इतर कोणत्याही संघाला परवडणारे नाही. ऐन मोक्याच्या क्षणी ते आपला खेळ उंचावतात आणि बाजी मारतात. ऑस्ट्रेलियन संघ ५ वेळचे विजेते आहेत, आणि या स्पर्धेत देखील ते संभाव्य विजेते असतील. संघाचा गेल्या काही महिन्यांचा प्रवास बघता ते अंतिम चार मध्ये नक्की असतील. सरतेशेवटी आपल्या भारतीय संघावर करोडो भारतीय क्रिकेट रसिकांचे लक्ष असेल. घरच्या मैदानावर खेळण्याचा त्यांना नक्की फायदा होईल. फक्त स्पर्धेच्या वेळी असलेला दबाव ते कसा हाताळतात हे बघणे महत्वाचे असेल. भारतीय संघाने नुकताच आशिया कप जिंकला आहे, आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील मालिका जिंकली आहे. आपले खेळाडू चांगल्या लयीत आहेत आणि त्यामुळेच या संघाकडून अपेक्षा आहेत. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचेल असे निश्चित वाटते. 

एकूणच येणारे ५-६ आठवडे भारतात क्रिकेटमय असतील यात शंका नाही. क्रिकेट हा अनेक भारतीयांसाठी जीव की प्राण आहे. त्यात १२ वर्षांनंतर भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत जगातील सर्वोत्कृष्ट १० संघ जीवाची बाजी करतील. विजेतेपद एकाच संघाला मिळणार आहे, पण या निमित्ताने होणारे ४८ सामने क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असेल. २०२३ ची ही दिवाळी ‘क्रिकेटवाली दिवाळी’ असेल यात शंका नाही. 

हैदराबादी बिर्याणीचा तडका 

हैदराबादने आपल्याला अनेक अप्रतिम क्रिकेटपटू दिले आहेत. गेल्या ५०-६० वर्षातील खेळाडूंवर नजर टाकली तर अबिद अली, अब्बास अली बेग, एम एल जयसिम्हा, मोहम्मद अझहरुद्दीन, व्ही व्ही एस लक्ष्मण, अंबाती रायुडू किंवा हनुमा विहारी सारखी नावं सहज घेता येतील. प्रामुख्याने हे सगळे फलंदाज. अगदी गोलंदाजांची गणना करायची झाली तरी अर्शद अयुब, वेंकटपथी राजू किंवा प्रग्यान ओझा असे मंदगती गोलंदाज सुद्धा आठवतील. (हैद्राबादचाच नोएल डेव्हिड आठवतोय का?) पण वेगवान गोलंदाजांच्या बाबतीत हैद्राबादचं नाव पटकन कोणी घेतलं नसतं. आज मोहम्मद सिराजने ती उणीव देखील भरून काढली. गेल्या काही वर्षांत भारतीय वेगवान गोलंदाजांची एकप्रकारची दहशत निर्माण झाली आहे, त्यामध्ये बुमराह आणि शमी पाठोपाठ सिराजचं देखील नाव घेता येईल. कालच्या आशिया कपच्या अंतिम सामन्यानंतर तर सिराजचं नाव सुवर्णअक्षरांनी लिहायला हवं आहे. 


कालचा दिवस सिराजचा होता. ७ षटकात २१ धावा देऊन ६ बळी. एकाच षटकात चार बळी. केवळ १६ चेंडूंमध्ये श्रीलंकेचा संघ मुळापासून उखडला…. महर्षी व्यासांनी हे क्रिकेटचं महाभारत लिहायला घेतलं असतं तरी इतकं परफेक्ट लिहिलं नसतं. काळ सिराजच्या गोलंदाजीला बिर्याणीचा तिखटपणा होता, ती सुद्धा साधी सुधी बिर्याणी नाही, तर स्पेशल हैद्राबादी तडका बिर्याणी. कोणीही गोलंदाज स्वप्नात सुद्धा विचार करू शकणार नाही अशी ती गोलंदाजी होती. त्या षटकात सिराजने श्रीलंकेची वरची फळी अक्षरशः कापून काढली. खरं तर सलग चार चेंडूंवर चार बळी मिळायचे, पण एक चौकार गेलाच मध्ये. चालायचंच, चंद्रावर सुद्धा डाग असतोच की. निसंका, समरविक्रमा, असलंका आणि डिसिल्व्हा… श्रीलंकेचे चार फलंदाज माघारी परतले, पाठोपाठ पुढच्या दोन षटकात कप्तान दसून शनका आणि मेंडिस देखील. या ७ षटकातच सिराजच्या आशिया कप खिशात घातला होता. भारतीय गोलंदाजांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये काही भन्नाट स्पेल्स टाकले आहेत. सिराजच्या या स्पेलची गणना पहिल्या क्रमांकावर असेल यात काही वाद नाही. सिराजच्या त्या स्पेल्स मधले २ त्रिफळाचित (बोल्ड्स) – शनका आणि कुशल मेंडिस, आणि धनंजय डिसिल्वाला टाकलेला चेंडू तर दृष्ट काढण्याजोगे होते. 

या सामन्यात भारताने अवघ्या ५० धावांवर श्रीलंकेला बाद केलं. सिराजच्या ६ बळी मिळवलेच, पण हार्दिकने ३ आणि बुमराहने १ बळी मिळवताना आपले हात देखील धुवून घेतले. हार्दिकने आपल्या कोट्याच्या १० ओव्हर्स टाकणे किती महत्वाचे आहे हे आता आपल्या लक्षात येईल. सिराजमुळे झालेली ती पडझड श्रीलंकेला सावरूच शकली नाही. त्यांचा कोणताही फलंदाज क्रिझवर टिकण्याच्या मूडमध्ये नव्हता. त्यातच भारतीय गोलंदाजांच्या लाईन आणि लेंग्थ मध्ये हे फलंदाज अडकत होते. श्रीलंकेचा संपूर्ण संघ केवळ १५ षटकात सर्वबाद होणं ही खरं म्हणजे नामूष्कीच आहे. आनंदाची गोष्ट ही की अवघ्या १५-१७ दिवसांवरच विश्वचषक आला असताना भारतीय संघ एक एक बॉक्स टिक करायला लागला आहे. पाकिस्तानच्या सामन्यानंतर आपण ज्या पद्धतीने कात टाकली आहे त्याला तोड नाही. हो मधेच बांगलादेशच्या सामन्यासारखा एखादा स्पीड ब्रेकर येतो, पण प्रवासात असा स्पीड ब्रेकर देखील आवश्यक असतोच. 

श्रीलंकेला इतक्या स्वस्तात बाद केल्यानंतर आपला विजय होणारच होता, पण आपल्या तरुण तडफदार फलंदाजांनी तो विजय देखील अगदी सहज मिळवला. केवळ ६.१ षटकात भारताने ही माफक धावसंख्या ओलांडली, आणि ते करताना आपला एकही बळी जाणार नाही याची देखील काळजी घेतली. क्रिकेटच्या भाषेत अशा विजयला ‘क्लिनिकल’ म्हणतात. ईशान किशन आणि शुभमन गिल या दोघांनीही थंड डोक्याने विजय मिळवून दिला. इतक्या सहजपणे विजय मिळवणे आपल्यासाठी तशी अवघड गोष्ट आहे, पण ती देखील आता सध्या होताना दिसते आहे. हा आशिया कप आपल्यासाठी खरंच वरदान ठरला आहे. संघातील बहुतेक फलंदाजांनी चांगल्या धावा केल्या आहेत. रोहित, विराट, गिल, राहुल, ईशान आणि हार्दिक … सगळेच कुठे ना कुठे चमकले आहेत. तीच गत गोलंदाजांची. बुमराह अनेक महिन्यानंतर मैदानावर परतला तरी बळी घेण्याची त्याची भूक अजूनही शाबूत आहे. तिकडे कुलदीपने आपल्या फिरकी गोलंदाजीवर बळी मिळवले, तर शार्दूल किंवा शमी देखील चांगली गोलंदाजी करताना दिसले. हार्दिक आणि जडेजा गोलंदाज म्हणून देखील समर्थपणे उभे राहताना दिसत आहेत. आणि कालच्या सामन्यात सिराजने तर कमाल केली आहे. 

आशिया चषकासाठी आपला संघ जाहीर झाला तेंव्हा बरेच प्रश्न होते. अर्थातच काही खेळाडूंच्या निवडीवरून, काही खेळाडूंच्या फॉर्म वरून आणि काही खेळाडूंच्या दुखापतींमुळे. आता विश्वचषक स्पर्धा केवळ १७ दिवसांवर आली असताना यातील काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळाली असतील अशी आशा आहे. बहुतेक खेळाडूंनी या स्पर्धेत चांगला खेळ केला आहे. विश्वचषक स्पर्धेच्या आधी आपण ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ सामन्यांची एक मालिका खेळू, ती आपल्यासाठी पूर्वपरीक्षा असेल. पण आता आपलं लक्ष मात्र ५ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या महत्वाच्या परीक्षेकडे आहे. १२ वर्षांपूर्वी धोनीच्या संघाने आपल्याला विश्वविजयी बनवले होते, आता अपेक्षा आहे रोहित आणि मंडळी त्या कामगिरीची पुनरावृत्ती करतील. आशिया कप नावाचा एक पेपर आपण सहज सोडवला आहे, अंतिम परीक्षेत काय होते ते बघणे महत्वाचे.  

आता नजर “बोर्डा” च्या परीक्षेकडे

भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना – या वाक्यातच बरंच काही साठलेलं आहे. या दोन देशांमध्ये क्रिकेटच्या मैदानावर असलेली खुन्नस आपण कायमच अनुभवतो, नव्हे आपण अनेकदा जगलो आहोत. गेली काही वर्षे आपण उभय देशांमधील मालिका खेळत नाही, पण आयसीसीच्या स्पर्धेत समोरासमोर आलो की दोन्ही देशांमधील हे द्वंद्व बघायला मिळतं. किंबहुना गेल्या काही वर्षात आयसीसीची कोणतीही स्पर्धा केवळ याच सामन्याकडे डोळे ठेवून खेळवली जाते का अशी शंका यावी. टी-२० असो अथवा एकदिवसीय सामना असो, दोन्ही संघ जीवाची बाजी लावून खेळताना दिसतात. आणि अर्थातच त्या सामन्यात भारताने विजय मिळवावा अशीच आपली भारतीयांची इच्छा असते. मागच्यावर्षी टी-२० विश्वचषकात मेलबर्नमध्ये झालेला सामना असो अथवा मागच्या आठवड्यात आशिया कप स्पर्धेत कोलंबो मध्ये झालेला एकदिवसीय सामना असो, प्रत्येकवेळी दोन्ही देशांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती. या सामन्याची काय मजा आहे, खेळाडूंच्या आणि प्रेक्षकांच्या देखील काय भावना आहेत हे जर एखाद्याला समजावून सांगावे लागत असेल तर तो मनुष्य भारत-पाकिस्तानातील नाही किंवा त्याला क्रिकेट आवडत नाही असेच म्हणावे लागेल. प्रत्येकवेळी आम्हा क्रिकेट रसिक त्याच भावनेने मैदानावर किंवा टीव्ही समोर (आता मोबाईल समोर) बसतो. क्रिकेट खेळणाऱ्या कोणत्याही देशाकडून हरलात तरी चालेल पण पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंका(च), अशी क्रिकेटप्रेमींची भावना असते. 


१०-११ सप्टेंबर २०२३ हे दोन दिवस असेच विलक्षण होते. कोलंबोमधे भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ भिडणार, म्हणजे संपूर्ण क्रिकेट जगताच्या नजरा त्या सामन्याकडे होत्या. काहीच दिवसांपूर्वी झालेला गटसाखळी मधला सामना पावसामुळे पूर्ण झाला नव्हता. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी त्या सामन्यात कमाल केली होती. भारतीय फलंदाजांना जखडून ठेवण्यात ते कमालीचे यशस्वी झाले होते. ईशान किशन आणि हार्दिक पांड्या उभे राहिले नसते तर कदाचित आपला डाव १५० मधेच आटोपला असता. पण या दोन्ही फलंदाजांनी दर्जेदार खेळ केला आणि आपल्याला एक सन्मानजनक स्कोअर उभा करण्यात मदत केली. दुर्दैवाने पावसामुळे पाकिस्तानचा डाव खेळता आला नाही. त्यांचे फलंदाज आणि आपले गोलंदाज यामधील सामना झालाच नाही. पण सुपर ४ च्या लढतीत संयोजकांनी आयत्यावेळी काही बदल केले आणि खास या सामन्यासाठी ‘रिजर्व्ह डे’ ठेवण्यात आला. त्यामुळे २ दिवस चाललेल्या या सामन्याचा निकाल तर लागलाच पण दोन्ही संघांच्या बलाबलाचा अंदाज देखील आला. 


पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली. आपल्या वेगवान गोलंदाजांवर त्याचा खासच भरवसा होता. आणि का नसेल? शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह या घडीचा सर्वोत्तम ‘पेस अटॅक’ आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पहिल्या सामन्यात देखील तिघांनी भारतीय फलंदाजांना सतावले होते. पण सलामीला आलेल्या रोहित आणि गिलच्या मनात काही वेगळेच होते. Attack is the best defence या तत्वानुसार दोघांनीही या गोलंदाजांची पिसं काढायला सुरुवात केली. त्यांच्या वेगाचाच फायदा घेऊन चेंडू सीमापार जाऊ लागले आणि तिघांचीही लय बिघडली. केवळ १३ षटकात भारताने शंभरी गाठली होती, आणि दोघेही फलंदाज अप्रतिम बॅटिंग करत होते. नाही म्हणायला नसीम शाहची गोलंदाजी काही प्रमाणात भेदक वाटत होती. त्याने दोन्ही फलंदाजांना त्रास द्यायला सुरुवात केलीच होती. रोहित आणि गिल पाठोपाठ बाद झाले आणि नंतर आलेल्या विराट आणि राहुलने सूत्रे आपल्या हातात घेतली. पण त्याचवेळी आलेल्या पावसाने त्या दिवशीचा खेळ थांबवावा लागला. दुसरा दिवस याच दोघांचा होता. सुरुवातीला काही वेळ स्थिरावण्यासाठी घेतल्यावर, दोघांनीही पाकिस्तानी गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. ज्या पद्धतीने विराटने आपला डाव उभारला त्याला तोड नाही. पहिल्या ५० धावांची ५५ चेंडू घेणाऱ्या विराटने पुढच्या ७२ धावा काढायला फक्त ३९ चेंडू घेतले. राहुलने देखील त्याला चांगली साथ दिली. त्याच्या फिटनेसवर असलेलं प्रश्नचिन्ह या खेळीमुळे दूर झालं असं म्हणायला हरकत नाही. विराटबरोबर ३०-३२ षटके मैदानावर उभे राहणे, दोघांच्याही धावा पळून काढणे यात तो यशस्वी ठरला. 

विराट आणि राहुलच्या खेळीनंतरच पाकिस्तानात अनेक टीव्ही सेट फुटले असतील. त्यांची जी काय उरली सुरली आशा होती, ती भारतीय गोलंदाजांनी धुळीस मिळवली. जसप्रीत बुमराहच्या फिटनेसवर देखील प्रश्न होतेच, पण त्यानेच पाकिस्तानी फलंदाजीला खिंडार पाडायला सुरुवात केली. त्याची लाईन आणि लेंग्थ प्रभावी होती. त्यावरच इमाम उल हक बाद झाला. तिकडे हार्दिकने अप्रतिम चेंडूवर बाबर आझमला बोल्ड केलं, शार्दुलने तशाच एका चेंडूवर रिझवानला घरी पाठवलं आणि भारताचा विजय सुनिश्चित झाला. ४ बाद ७७ वरून पाकिस्तानी संघ किती तग धरेल हाच प्रश्न होता. विजयाचे पुढचे सोपस्कार कुलदीप यादवने पूर्ण केले. त्याची गोलंदाजी एकही पाकी फलंदाजाला खेळता येत नव्हती. केवळ ३२ षटकात पाकिस्तानचा डाव १२८ धावांत आटोपला, आणि भारताने तब्बल २२८ धावांनी विजय मिळवला. भारताच्या क्रिकेट इतिहासातील हा एक मोठा आणि महत्वाचा विजय आहे हे नक्की. या दोन देशांमधला सामना कायमच भारतीय फलंदाज विरुद्ध पाकिस्तानी गोलंदाज असा बघितला जातो, पण या सामन्यात भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांची नांगी ठेचली. महिनाभरातच हे दोन्ही संघ परत एकदा समोरासमोर येतील, ते देखील विश्वचषकात. त्यावेळी भारतीय संघाला कोलंबो मध्ये झालेल्या या सामन्यामुळे एक वेगळा कॉन्फिडन्स आला असेल यात काही शंका नाही. 

विराट आणि पाकिस्तान हे वेगळं नातं आहे. आपण वेळोवेळी मैदानावर ते बघितलं आहे. विराट मोठ्या सामन्याचा खेळाडू आहे, आणि त्याने ते सिद्ध देखील केलं आहे. टी-२० विश्वचषकात मेलबर्नला खेळताना त्याने हॅरिस रौफला आखूड टप्प्याच्या चेंडूवर समोर लॉन्गऑन च्या डोक्यावरून एक षटकार मारला होता, तसाच षटकार त्याने परत एकदा भारताच्या डावात शेवटच्या चेंडूवर मारला. तो षटकार असेल किंवा रोहितने पहिल्या षटकात आफ्रिदीला मारलेला षटकार असेल, भारतीय फलंदाजांनी आपली तयारी दाखवून दिली आहे. आता प्रतीक्षा आहे ती विश्वचषक सामन्याची.. प्रीलिममध्ये उत्तीर्ण झालेला भारतीय संघ बोर्डाच्या परीक्षेत कशी कामगिरी करतो हे बघणे महत्वाचे आहे.  

अखेर निवड झालीच 

२०२३ चा क्रिकेट विश्वचषक अवघ्या एक  महिन्यावर आला असताना मागच्या आठवड्यात भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीने १५ सदस्यीय संघाची घोषणा करताना आशिया कप साठी निवडलेला संघच कायम ठेवला. रोहित शर्मा संघाचा कर्णधार असेल आणि हार्दिक पांड्या उपकर्णधार. अर्थातच या संघात काही ‘सरप्राइजेस’ नाही बघायला मिळाले. बहुतेक खेळाडूंची निवड यथायोग्य होती, पण काही महत्वाच्या जागांसाठी कोणते खेळाडू निवडणार याकडे बहुतेकांचे लक्ष होतेच. १२ वर्षानंतर या विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. २०११ मध्ये झालेली स्पर्धा आपण जिंकलो होतो. त्यानंतर २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी वगळता एकही आयसीसी स्पर्धेत आपल्याला यश मिळालेले नाही. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅट्स मध्ये आयसीसी स्पर्धेत आपण कायम उपांत्य किंवा अंतिम फेरीत जाऊन हरतो आहोत. कदाचित त्यामुळेच या विश्वचषक स्पर्धेकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष आहे. ही घरच्या मैदानावर होणारी स्पर्धा आपण जिंकावी अशीच भारतीय रसिकांची इच्छा आहे. 


निवडलेल्या संघाचा विचार करता कागदावर हा संघ नक्कीच तुल्यबळ वाटतो. पण तसेही कोणत्याही महत्वाच्या स्पर्धेतील भारतीय संघ कागदावर नेहेमीच तुल्यबळ असतो. आपल्या फलंदाजीचा विचार करता संघात रोहित, विराट, शुभमन गील , श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव सारखे दर्जेदार फलंदाज आहेत. पण सध्या बहुतेकांच्या बॅट्स त्यांच्यावर रुसल्या आहेत. फॉर्मात असलेला आणि सलग गोलंदाजांची पिसं काढणारा रोहित, किंवा सरळ बॅटने मैदानाच्या चारही कोपऱ्यात चेंडू भिरकावून देणारा विराट बघून आता किती महिने झाले हे आठवावेच लागेल. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर दोघेही पूर्वपुण्याईवर संघात आहेत असं म्हणता येईल. परवा पाकिस्तानविरुद्ध दोघेही ज्या पद्धतीने बाद झाले ते बघता विश्वचषक स्पर्धेत अनेक दर्जेदार गोलंदाजांचा सामना ते कसा करतील हा प्रश्न पडला आहे. आज दोघेही वयाच्या पस्तिशीत आहेत, अशावेळी खरं तर याआधीच दोघांनीही आपल्या फॉर्मकडे बघता आपली जागा रिकामी करायला हवी होती का? शुभमन गील आयपीएल पर्यंत प्रचंड फॉर्म मध्ये होता, पण टेस्ट चॅम्पियनशीप नंतर मात्र त्याची बॅट बोलेनाशी झाली आहे. हा खरोखर गुणवान फलंदाज आहे, पण पाठीशी धावा नसतील तर खेळाडूची निवड व्यर्थच ठरते ना. श्रेयस अय्यर देखील गेले अनेक महिने दुखापतग्रस्त आहे. आशिया कप मध्ये त्याने संघात पुनरागमन केले खरे, पण ९ चेंडूच्या एका खेळीनंतर त्याने विश्वचषक संघात येणे कुठेतरी खटकते. सूर्यकुमार यादवची देखील तीच तऱ्हा. तो टी-२० सामन्यात खोऱ्याने धावा काढतो आहे, पण एकदिवसीय सामन्यात मात्र त्याची बॅट रुसते. अशावेळी त्याच्याऐवजी दुसरा फलंदाज येऊ शकला असता का? 

आपल्याकडे के एल राहूल आणि ईशान किशन असे दोन यष्टीरक्षक फलंदाज आहेत. अर्थातच राहूलला आपण मारून मुटकून यष्टीरक्षक केलं आहे. तो देखील दुखापतीमधून सावरतो आहे. अशावेळी त्याची कोणत्याही प्रकारे फिटनेस टेस्ट न घेता, कमबॅक नंतरचा फॉर्म न बघता त्याला संघात स्थान मिळाले आहे. राहूल आणि श्रेयस गेले अनेक महिने कोणत्याही स्पर्धात्मक क्रिकेटपासून लांब आहेत. अशावेळी त्यांना लगेचच संघात स्थान मिळणे हा इतर अनेक क्रिकेटपटूंचा अपमान नाहीये का? दुसरीकडे ईशान किशन मात्र चांगल्या पद्धतीने धावा करतो आहे. सलामीला असो अथवा मधल्या फळीत, तो आपली भूमिका नक्कीच पार पाडतो. तो डावखुरा असल्याचा थोडा फायदा मिळतो हेही नसे थोडके. अर्थात त्याला आपल्या यष्टिरक्षणावर काम करणे आवश्यक आहे. पण कोणत्याही अंतिम संघात निवड होताना कर्णधार आणि उपकर्णधार यानंतर त्याची निवड होणे सार्थ वाटते. 

१९८३ किंवा २०११ चा विश्वचषक जिंकताना आपल्या संघात अनेक अष्टपैलू खेळाडू होते. कपिल किंवा युवराज भोवती आपण आपले डावपेच रचू शकत होतो. या विश्वचषक स्पर्धेत आपल्याकडे हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि शार्दूल ठाकूर सारखे अष्टपैलू खेळाडू आहेत. पैकी कोणत्या खेळाडू भोवती आपण आपली व्यूहरचना करणार आहोत? हार्दिक पांड्याने काही चांगल्या खेळी केल्या असल्या तरी त्याची तुलना कपिल देव बरोबर किंवा अक्षर पटेलची तुलना युवराज बरोबर नाही होऊ शकत. शार्दूल ठाकूर कधीतरी दोन-चार फटके मारतो, पण म्हणून त्याला ऑलराऊंडर म्हणणं म्हणजे नेपाळच्या क्रिकेट संघाला आशिया कपचा विजेता म्हणण्यासारखं आहे. रवींद्र जडेजा हा मात्र खऱ्या अर्थाने ऑलराऊंडर आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर तो प्रभावी गोलंदाज ठरेल, मैदानावर तो २०-२५ धावा अडवेल आणि गरजेच्या वेळी तो चांगली फलंदाजी देखील करेल याची खात्री वाटते. जडेजा आणि चालला तर हार्दिक यांच्या जोरावर आपण ‘अष्टपैलू’ विभागाचा कोटा पूर्ण करतो आहोत. इथे अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अक्षर पटेलची निवड. जडेजा संघात असताना परत त्याच पठडीतला गोलंदाज संघात असणे चुकीचे वाटते. आपण संघात आपल्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजाला स्थान देत नाही, किंबहुना त्याचा विचार देखील करत नाही याचे नवल वाटते. इतर संघांमध्ये अनेक डावखुरे चांगले फलंदाज असताना आपल्या संघात रविचंद्रन अश्विन नसावा हे आपले वैचारिक दारिद्रय म्हणावे का? अश्विन किंवा युझवेन्द्र चहलची निवड होणे आवश्यक होते. पण निवड समितीने या दोन उत्तम फिरकी गोलंदाजांना डावलून – तेही एक ऑफस्पिनर आणि दुसरा चांगला लेगस्पिनर, जडेजा-अक्षर-कुलदीप या तीन डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांना स्थान दिले आहे. 

वेगवान गोलंदाजी विभागात बुमराहचे पुनरागमन आशादायक आहे. त्याने काही सामने खेळून आपला फिटनेस देखील सिद्ध केला आहे. दुसरीकडे शमी आणि सिराज यांनी देखील आपली निवड सार्थ ठरवली आहे. हे तिघेही फॉर्मात असतील तर प्रतिस्पर्धी संघ हतबल होतो हे आपण बघितले आहे. पण एखाद्या दिवशी विश्वविजेत्या संघाला धूळ चारणारे आपले गोलंदाज नंतरच्या सामन्यात अगदी सामान्य संघापुढे हात टेकतात हे देखील आपल्याला ठाऊक आहे. किंबहुना तो आपला इतिहास आहे असे म्हटले तरी चालेल. परवा नेपाळ विरुद्धच्या सामन्यात देखील आपण हे अनुभवले आहे. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे आपल्या संघात एकही डावखुरा वेगवान गोलंदाज नाही. खरे तर झहीर खान नंतर आपण असा कोणी गोलंदाज तयार केलाच नाही. आज जागतिक क्रिकेटमध्ये ट्रेंट बोल्ट, मिशेल स्टार्क, सॅम करन, शाहीन आफ्रिदी, मुस्ताफिझूर रहमान सारखे डावरे वेगवान गोलंदाज धुमाकूळ घालत असताना आपण मात्र त्यांना चटणी कोशिंबिरी इतके देखील स्थान देत नाही. 
एकूणच या १५ खेळाडूंचा संघ आताच्या घडीला कागदी वाघ वाटतो. या वाघांनी चांगला खेळ केला तर ठीक आहे, अन्यथा परत एकदा आपण या स्पर्धेतून लवकर बाहेर पडू. गेले तीन विश्वचषक आपण निदान उपांत्य फेरीत पोहोचतो आहोत, यावर्षी तेच ध्येय ठरवून आपल्याला पुढे जावे लागेल. मार्ग कठीण आहे, पण आपले १५ शिलेदार तोपर्यंत तयार होतील अशी आशा करूया. 

घोळ चौथ्या क्रमांकाचा

विश्वचषक स्पर्धेचं वर्ष आहे. आपला संघ जोरदार तयारी करतो आहे. वेगवेगळ्या स्पर्धा, इतर काही देशांशी द्विपक्षीय मालिका सुरु आहेत. कधी भारतात तर कधी परदेशात भारतीय संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आहे. आणि अशातच चौथ्या क्रमांकावर खेळायला आपल्याकडे एकही धड फलंदाज नाही. त्या क्रमांकावर आपण अजूनही अडखळतो आहोत. त्या क्रमांकावर खेळण्यासाठी योग्य खेळाडूचा शोध सुरु आहे. कधी अमक्याला आजमावून बघ, कधी तमक्याकडे ती जबाबदारी दे असा काहीसा प्रयोग सुरु आहे. ही गोष्ट ऐकल्यासारखी वाटते ना? क्रिकेट रसिकांना तर अगदी अनुभवल्यासारखी वाटत असेल. अहो चार वर्षांपूर्वी, २०१९ च्या विश्वचषकाच्या वेळी हेच तर घडत होतं. इंग्लंडमध्ये झालेल्या त्या विश्वचषक स्पर्धेच्या वेळी आपण चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजासाठी झगडत होतो. अंबाती रायुडू, अजिंक्य राहणे सारख्या फलंदाजांचा विचार सोडून देऊन आपण इतर काही खेळाडूंना मारून मुटकून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवत राहिलो. के एल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत…अहो इतकंच काय पण विजय शंकरला देखील आपण त्या क्रमांकावर खेळवत राहिलो. आणि शेवटी त्याचा व्हायचा तो परिणाम झालाच. आपली सलामीची जोडी एखाद्या सामन्यात चमकली नाही आणि मधल्या फळीवर त्याचा भार आला, तो सामना हातातून गेलाच. उपांत्य फेरीत, न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात हेच घडलं आणि आपण विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडलो. हे सगळं परत आठवायचं कारण म्हणजे २०२३ हे देखील विश्वचषकाचं वर्ष आहे. भारतात होणार विश्वचषक आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे, आणि आपण परत एकदा चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूसाठी झगडतो आहोत. 


क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळायला येणारा खेळाडू म्हणजे खऱ्या अर्थाने संघाचा कणा असतो. टी-२० क्रिकेटचं जाऊ द्या, पण कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचं महत्व वेगळंच आहे. सलामीची जोडी टिकून उभी आहे आणि जोरदार खेळ करत आहे, संघाला अपेक्षित धावसंख्या समोर दिसते आहे. अशावेळी तो रन रेट वाढवण्याची जबाबदारी या फलंदाजाची असते. समजा सुरुवातीचे खेळाडू लवकर बाद झाले, आणि सामना गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे झुकत चालला असेल तर आपल्या संघाला चांगल्या स्थितीत घेऊन जाण्यासाठी या फलंदाजालाच प्रयत्न करावे लागतात. कोणत्याही संघाची मधली फळी, जी चौथ्या क्रमांकापासून सुरु होते, बरेचदा संघासाठी महत्वाची कामगिरी करत असते. कदाचित त्यामुळेच हा चौथ्या क्रमांकाचा खेळाडू / फलंदाज महत्वाचा ठरतो. आज क्रिकेट इतकं बदलल्या नंतरही बहुतेक संघ या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजासाठी आग्रही असतात. पण विश्वचषक इतका जवळ येऊन देखील आपल्याला या विश्वचषकात आपला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज कोण असेल हे सांगता येत नाही. 

आज भारतीय संघाला दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. खेळाडू आणि दुखापती हे अगदी जवळचं नातं आहे. आपल्या बाबतीत देखील तेच होतंय. मागच्या वर्षी आपला प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त होऊन नॅशनल क्रिकेट अकॅडमी (NCA) मध्ये दाखल झाला. त्याची दुखापत बरेच दिवस चालली. त्यात आपण त्याला खेळवण्याची घाई केली, आणि नको तेच घडलं. त्याला परत एकदा NCA चा रास्ता पकडावा लागला. त्यानंतर रिषभ पंतचा तो दुर्दैवी अपघात झाला. दुर्दैवाने तो अजूनही स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे. जीवघेण्या अपघातातून तो बाहेर आला हाच मोठा चमत्कार असताना, तो परत स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये कधी येईल हे सांगता येणे अवघड आहे. आपल्या क्रिकेटचा आणि अधिकाधिक सामने खेळण्याचा अट्टहास आपल्या खेळाडूंच्या जीवाशी येतो याचा विचार कोणीच करत नाही. कोलूला जुंपलेल्या बैलासारखे हे खेळाडू वर्षातले बारा महिने खेळत असतात. कधी आंतरराष्ट्रीय मालिका, तर वर्षातले २ महिने न थकता आयपीएल यामुळे खेळाडू शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या देखील कमजोर होतात. गेल्या काही महिन्यात के एल राहुल, श्रेयस अय्यर सारखे खेळाडू NCA च्या वाऱ्या करत आहेतच. आपले तीन प्रमुख फलंदाज (पंत, राहुल आणि अय्यर) जायबंदी झाल्याने आपला चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूचा प्रश्न सुटला तर नाहीच, पण तो अधिक गहन झाला आहे. रिषभ पंत इतक्या लवकर मैदानावर दिसणार नाहीच, त्यामुळे राहुल आणि अय्यर या दोघांमध्ये चौथ्या क्रमांकासाठी चुरस असेल. 

आपल्या आजच्या विश्वचषक संघाचा विचार करता रोहित, विराट, गील, ईशान किशन सारख्या फलंदाजांचं स्थान पक्कं आहे. हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा किंवा काही प्रमाणात अक्षर पटेल सारखे अष्टपैलू खेळाडू आपली खालची फळी सांभाळतील. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजूनही न स्थिरावलेला सूर्यकुमार यादव आणि या फॉरमॅट मध्ये अजिबात न आजमावलेला तिलक वर्मा हे देखील महत्वाचे फलंदाज आहेत, पण आत्ता ऐन मोक्याच्या क्षणी त्यांच्यावर जबाबदारी देता येईल का अशी शंका आहे. अशावेळी आपण फिरून फिरून परत एकदा राहुल आणि श्रेयस अय्यरकडेच येतो आहोत.

विश्वचषकाच्या आधी आपण आशिया कप खेळतो आहोत आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची एक छोटी मालिका होईल. या एकूण ८-९ सामन्यांमध्येच आपल्याला हा हुकमी एक्का शोधणं आणि तपासणं आवश्यक आहे. राहुल आणि अय्यर अनेक महिन्यांनंतर संघात परत येतील, त्यांचा फॉर्म कसा असेल, त्यांची दुखापत परत डोकं वर काढेल का हे प्रश्न असतीलच. की आपण रोहित-गील कडे सलामीची जबाबदारी देऊन ईशान किशनला चौथ्या क्रमांकावर खेळायला पाठवू? काही दिवसांपूर्वी रवी शास्त्रीने चौथ्या क्रमांकासाठी विराट कोहलीचे नाव सुचवले, तर आपण तसा काही प्रयोग करून बघू असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत. 

आपल्या एकदिवसीय संघाच्या सेटअप मधून आपण काही वर्षांपूर्वी अजिंक्य राहणे सारख्या फलंदाजाला बाहेर फेकलं. वास्तविक तो संघातील सर्वोत्तम फलंदाज होता, अजूनही आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या फलंदाजाची आक्रमकता आणि फलंदाजीचे योग्य तंत्र या दोहोंची सांगड त्याच्याकडे आहे. फॉर्म नाही या कारणास्तव तो एकदिवसीय संघातून बाहेर पडला आणि आपल्याला चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांचा प्रश्न सतावू लागला. आज तो संघात असता तर हा प्रश्न कदाचित निर्माण झालाच नसता. पण मोकळ्या मानाने त्याला परत संघात सामील करून घेण्याइतका मोठेपणा आपल्याकडे नाही. आणि आता उपलब्ध असलेल्या फलंदाजांमधून योग्य फलंदाज शोधणे हे नक्कीच जिकिरीचे काम आहे. दुर्दैवाने सध्याच्या घडीला आपण अजूनही के एल राहुल आणि श्रेयस अय्यर या दोन फलंदाजांपलीकडे बघू शकत नाहीये. या दोघांनीही तंदुरुस्त होऊन चांगला खेळ करावा आणि भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेत चांगले यश मिळवून द्यावे हीच आशा असेल. सध्यातरी त्यांच्याच खांद्यावर चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूची महत्वाची जबाबदारी आहे. 

खेळणार आशिया कप, लक्ष विश्वचषकाकडे 

बहुचर्चित आशिया कप क्रिकेट स्पर्धा आता केवळ २ दिवसांवर आली आहे. खरे तर आशिया मधील ही मोठी स्पर्धा म्हटली गेली पाहिजे. आज भारतीय उपखंडातील बहुतेक सर्वच देश आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतात. या वर्षीच्या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे संघ सहभागी होणार आहेत, म्हणजे ही खरी तरी भारतीय उपखंडाचीच स्पर्धा आहे. स्पर्धा कधी खेळवायची, कुठे खेळवायची असे सगळे महत्वाचे मुद्दे आणि त्यामुळे होणाऱ्या खंडीभर चर्चा पार पडल्यानंतर पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशात हे सामने आयोजित होत आहेत. ३० ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेचे काही सामने पाकिस्तानात तर बहुतेक सर्व महत्वाचे सामने (भारताचे सर्वच) श्रीलंकेत पार पडतील. या स्पर्धंनंतर ३-४ आठवड्यातच विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होईल, त्याची पूर्वतयारी म्हणून या स्पर्धेकडे बघितले जात आहे, आणि त्यामुळे देखील ही स्पर्धा महत्वाची ठरते. नेपाळ वगळता इतर सर्वच संघ विश्वचषकात सहभागी होत असल्याने प्रत्येक संघाला आपली बलस्थाने या स्पर्धेद्वारे तपासून घेता येणार आहेत. 


भारतापुरता विचार करायचा झाल्यास, आपल्या गटात पाकिस्तान आणि नेपाळ या दोन संघांचा समावेश आहे. अर्थातच भारत विरुद्ध पाकिस्तान ही लढत किमान २ वेळा होईल याची संयोजकांनी खबरदारी घेतली आहे. अंतिम सामन्यात पुन्हा एकदा हे संघ समोरासमोर आले तर ती तिसरी लढत असेल. काही दिवसांपूर्वीच आपला भारतीय संघ जाहीर झाला, आणि आशिया कप स्पर्धेवर नजर ठेवत आपण आता बऱ्यापैकी विश्वचषकाचा संघ देखील काय असेल याचा अंदाज बंधू शकतो. रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आता या दोन्ही स्पर्धांसाठी तयार आहे का हा खरा कळीचा प्रश्न आहे. आशिया कप स्पर्धेसाठी झालेल्या संघ निवडीमुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत हे नक्की. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा. मागच्याच आठवड्यात आपला मॅच फिटनेस दाखवणारे जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा सारखे खेळाडू या संघात आहेत, तर अजूनही आपल्या फिटनेसशी झगडणारे के एल राहूल आणि श्रेयस अय्यर देखील आशिया कप संघाचा भाग आहेत. त्यात काही रिपोर्ट्स प्रमाणे राहूल अजूनही फिट असल्याचे दिसत नाही, त्यामुळे तो एखाद दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. त्यात आपण राहूल कडे यष्टिरक्षकाची जबाबदारी देखील देऊ पाहत आहोत. या दोन्ही खेळाडूंची यो-यो टेस्ट देखील झाली नाहीये असेही सांगितले जात आहे. गेले अनेक महिने ते क्रिकेटपासून दूर आहेत अशावेळी विश्वचषक स्पर्धेवर नजर ठेवून त्यांना या  स्पर्धेद्वारे आजमावण्याचे प्रयत्न होत आहेत. एखाद्या खेळाडूला मुख्य प्रवाहात इतक्या लवकर आणण्यामागे बीसीसीआयची काय भूमिका असावी? खेळाडूला दुखापत होणे अपरिहार्य आहे, पण त्या दुखापतीमधून त्याला पूर्ण बरे होऊ देणे, त्याचे नीट पुनर्वसन (Rehabilitation) होणे आवश्यक आहे असे कोणाला नाही का वाटत? 


जी गत राहुल आणि अय्यरची तीच काही प्रमाणात बुमराह आणि प्रसिद्धची आहे. अर्थात त्या दोघांनी निदान २ टी-२० सामने खेळून स्वतःला सिद्ध तरी केले आहे. पण तरीही काही प्रमाणात ही एक रिस्क आहेच ना. टी-२० सामन्यात ३-४ षटके गोलंदाजी करणे आणि आशिया कप किंवा विश्वचषकासाठी पूर्णपणे फिट असणे यामध्ये मोठा फरक आहे. एकीकडे या चार खेळाडूंच्या फिटनेसचा प्रश्न उभा आहे, तर दुसरीकडे काही खेळाडूंची निवड का झाली आहे असा प्रश्न पडतो. यात प्रामुख्याने एक नाव समोर आले ते म्हणजे तिलक वर्मा याचे. या गुणी तरुण खेळाडूला संधी मिळावी असे नक्की वाटते, तशी ती त्याला मिळते देखील आहे. पण या एकदिवसीय स्पर्धेसाठी त्याची निवड त्याचे टी-२० क्रिकेटमधले योगदान बघून मिळते आहे. आयपीएलमधील चांगल्या कामगिरीमुळे त्याला भारताच्या टी-२० संघात स्थान मिळाले, आणि तिथे जरा बरी कामगिरी झाल्यानंतर तो जर एकदिवसीय आशिया कप साठी संघात येत असेल तर काही चुकते आहे का? तीच अवस्था सूर्यकुमार यादवची. तो टी-२० क्रिकेटमध्ये भन्नाट खेळतो, पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र सातत्याने फ्लॉप होतो आहे. अशावेळी इतर काही खेळाडूंना साधी द्यायला हवी होती का? संघातील इतर फलंदाजांची निवड होणार होतीच. किंबहुना त्याच फलंदाजांवर आपल्या संघाची भिस्त असेल. पण विश्वचषक स्पर्धा आणि चौथ्या क्रमांकावर खेळणारा खेळाडू हा आपला प्रश्न कायम असेल. अशावेळी संघाच्या चौकटीत अजिंक्य राहणे सारखा खेळाडू बसू नये याचे नवल वाटते.       

वेगवान गोलंदाजांचा विचार करता फारसे काही प्रश्न उद्भवत नाहीत, पण फिरकी गोलंदाजांचे काय. जगातील सर्वोत्तम ऑफ स्पिन बॉलर तुमच्या संघात नसतो? आज बहुतेक सर्वच संघात ३-४ डावखुरे फलंदाज असताना तुम्ही अश्विन सारख्या गोलंदाजाला बाहेर ठेवता? आजच्या संघात रवींद्र जडेजा सारख्या गोलंदाजांची निवड अपरिहार्य आहे, पण त्याच शैलीतल्या अक्षर पटेलला स्थान मिळते? जडेजा आणि अक्षर दोघेही एकाच प्रकारचे फलंदाज आणि गोलंदाज देखील आहेत, मग दोघेही कशाला? चहलला संघात न निवडल्यामुळे देखील प्रश्न उभे राहिले आहेत. पण कदाचित कुलदीप यादवची निवड जास्त अचूक असू शकेल. अर्थात या विभागाकडे बघता रवी अश्विन संघात नाही याचे वाईट वाटते आणि या सांघिक योजनांवर प्रश्न देखील निर्माण होतात. 

या स्पर्धेला इतके महत्व येण्याचे कारण म्हणजे आता विश्वचषक स्पर्धा केवळ काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे या आशिया कप संघात खेळणारे खेळाडूच कमी जास्त प्रमाणात विश्वचषक संघात असतील हे निश्चित आहे. सर्वच खेळाडूंना आपली बलस्थाने आजमावण्याची संधी या स्पर्धंद्वारे मिळत आहे. कदाचित म्हणूनच या स्पर्धेसाठी झालेली संघनिवड महत्वाची ठरते. विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून बघत असताना हे खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे लक्ष असेल. खेळाडू चांगले खेळले, दुखापतींपासून लांब राहिले तर ठीकच. पण दुर्दैवाने काही गोष्टी चुकीच्या घडल्या तर विश्वचषकासाठी त्या बदलण्याचा वेळ देखील आपल्याकडे नाही. या निवडलेल्या संघातील १५ खेळाडूच विश्वचषक संघाचा भाग असणार आहेत, त्यामुळे या खेळाडूंवर लक्ष असणे अपरिहार्य आहे. 

द डॉन 


२७ ऑगस्ट १९०८, बरोबर ११५ वर्षांपूर्वी त्या फलंदाजाचा जन्म झाला. वयाच्या २१ व्या वर्षी, १९२८ मध्ये तो आपला पहिला कसोटी सामना खेळला. त्या सामन्यात त्याची कामगिरी ठीकठाकच होती. पुढच्या कसोटीसाठी त्याला वगळलं गेलं, पण त्याच्या पुढच्या कसोटी सामन्यात तो परत एकदा संघात आला. त्या सामन्यात त्याने एक अर्धशतक आणि एक शतक केले, आणि त्यानंतर कधी मागे वळून बघितलंच नाही. पुढे ५२ कसोटी सामन्यात ६९९६ धावा, त्यात २९ शतकं (पैकी १० द्विशतकं आणि २ त्रिशतकं). धावांची सरासरी (९९.९४) कोणी मोडू शकलेलं नाही, आणि कोणी मोडेल अशी शक्यता देखील नाही. सर डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन या माणसाने क्रिकेट गाजवलं आहे. त्याच्या काळात फक्त कसोटी क्रिकेट खेळलं जात असे म्हणून, नाहीतर एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट (किंवा इतर कोणत्याही फॉरमॅटमध्ये) देखील तो सर्वश्रेष्ठ ठरला असता यात काही वाद नाही.
 
त्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रामुख्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्येच होत असे. वेस्टइंडीज, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, भारत या सारखे देश आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तसे कच्चे बच्चे होते. ब्रॅडमनने ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले तेव्हा या दोन देशातील क्रिकेटला साधारण ५० वर्षे झाली होती. पण त्यांच्यामधील मालिका तितक्याच चुरशीने खेळल्या जात असत. एक एक दौरा पाच-सहा महिने चालत असे. १९२८-२९ मध्ये इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आला तेव्हा ब्रॅडमनने क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुढे दोन वर्षांनी, १९३०मध्ये ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. हा दौरा खऱ्या अर्थाने ब्रॅडमनच्या क्रिकेटला कलाटणी देणारा ठरला. या दौऱ्यात खरा ‘डॉन’ समोर आला. नॉटिंगहॅमला पहिल्या कसोटीत १३१, लॉर्ड्सवर दुसऱ्या कसोटीत २५४, लीड्सवर तिसऱ्या कसोटीत ३३४ आणि ओव्हल मैदानावर पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत २३२ धावा अशी त्याची कामगिरी होती. पाच कसोटी सामन्यांच्या त्या मालिकेत ब्रॅडमनने  १३९.१४ धावांच्या सरासरीने तब्बल ९७४ धावा केल्या. लीड्सवरील सामन्यात त्याने एका दिवसात ३०० धावा केल्या होत्या. इंग्लिश गोलंदाजीची एवढी कत्तल त्या आधी कोणी केली नव्हती. एका फलंदाजाने त्या मालिकेत इंग्लिश संघाला, त्यांच्याच मैदानावर, त्यांनीच शोध लावलेल्या खेळात लोळवलं होतं. 

त्या मालिका विजयानंतर डॉन ब्रॅडमन हे नाव मोठा आदराने घेतलं जाऊ लागलं. अर्थातच कट्टर इंग्लिश खेळाडूंना आणि समीक्षकांना ब्रॅडमॅनचं हे कृत्य आवडलं नव्हतंच. आणि मग पुढच्या मालिकेत त्यांनी त्याचा तोडगा काढायचा प्रयत्न केला. १९३२ साली ऑस्ट्रेलियात झालेली पुढची मालिका वादग्रस्त ठरली. किंबहुना क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त मालिका असा उल्लेख करता येईल. या मालिकेत इंग्लिश कप्तान आणि गोलंदाजांनी अत्यंत तिखट मारा करून ऑस्ट्रेलियन फलंदाजांना नामोहरम करायला सुरुवात केली. अंगावर चेंडू टाकून त्याला जायबंदी करणे हेच त्यांचे शस्त्र ठरू लागले. त्या काळात हेल्मेट नव्हतं, चेस्ट गार्ड किंवा इतर संरक्षणात्मक गोष्टींचा शोध लागला नव्हता. त्याकाळी खेळपट्टी देखील आच्छादीत केली जात नसे. कोणा फलंदाजाच्या छातीवर चेंडू आपटला तर कोणाच्या डोक्यावर. इंग्लिश गोलंदाजांनी एकामागून एक बाउन्सर आणि बिमर टाकत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जखडून ठेवलं होतं. ब्रॅडमनच्या त्या १९३० च्या दौऱ्यातील खेळीचा प्रचंड परिणाम इंग्लिश खेळाडूंवर झाला होता. तरीही त्या दौऱ्यात ब्रॅडमनची सरासरी साधारण ५७ होती, जी आजही कोणत्याही फलंदाजासाठी मोठी मानली जाते. या बॉडिलाइन मालिकेने क्रिकेटच्या नियमांचे सगळेच मापदंड बदलले, पण एका फलंदाजाला झुकवण्यासाठी मैदानावर काही अनैतिक, काही अंशी अमानवीय खेळ त्या आधी देखील झाला नव्हता, आणि त्या नंतरही झाला नाही. कदाचित यामध्येच ब्रॅडमनची महती लक्षात यावी. 

ब्रॅडमन त्याच सुमारास वेस्टइंडीज आणि दक्षिण आफ्रिका संघांविरुद्ध देखील खेळला, आणि कारकिर्दीच्या शेवटी १९४८ साली भारतीय संघाविरुद्ध देखील. पण खऱ्या अर्थाने इंग्लिश संघाविरुद्ध त्याची बॅट चमकली. १९३८ ते १९४६ या काळात महायुद्धामुळे क्रिकेट खेळलं गेलं नाही. ब्रॅडमनच्या कारकिर्दीतील महत्वाची वर्षे युद्धामुळे वाया गेली, अन्यथा तो अजूनच चमकला असता. ज्या प्रकारचं क्रिकेट तो खेळत असे, त्याची धावांची सरासरी लक्षात घेता, कदाचित त्याने कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा देखील सहज गाठला असता. ब्रॅडमनने लीड्स मैदानावर २ त्रिशतकं ठोकली. १९३२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो २९९ धावांवर नाबाद राहिला, नाहीतर तीन त्रिशतकं करण्याचा रेकॉर्ड त्याच्यानावे लागला असता. ब्रॅडमन आणि मेलबर्न क्रिकेट ग्राउंड यांचं एक वेगळं नातं होतं. त्या मैदानावर ११ कसोटी सामन्यात त्याने १२८ च्या सरासरीने १६७१ धावा केल्या आहेत, आणि त्यामध्ये तब्बल ९ शतकं आहेत. हा देखील एक प्रकारचा विक्रम म्हणावा लागेल. 

१९३० च्या सुमारास जगभर मंदी होती. अनेक उद्योगधंदे बंद झाले होते, पुरेश्या नोकऱ्या उपलब्ध नव्हत्या. ऑस्ट्रेलियाची अर्थव्यवस्था देखील याला अपवाद नव्हती. असे म्हणतात की अशावेळी डॉन ब्रॅडमनच्या त्या खेळींनी खऱ्या अर्थाने ऑस्ट्रेलियन तरुण पिढीला त्या संघर्षाचा मुकाबला करण्यासाठी एक वेगळी ऊर्जा दिली.  ब्रॅडमन महान फलंदाज होता यात काहीच वाद नाही. १९४८ मध्ये युद्धानंतर तो इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला तेव्हा तो कप्तान होता. त्या दौऱ्यावर, वयाच्या ४० वर्षीदेखील तो अप्रतिम खेळला. त्या दौऱ्यावर देखील त्याने २ शतके केली. त्या संपूर्ण दौऱ्यावर ते एकूण ३४ सामने खेळले (५ कसोटी आणि इतर फर्स्ट क्लास सामने). पैकी २५ सामन्यात त्यांनी विजय मिळवला, आणि ९ सामने अनिर्णित ठरले. म्हणजे ते एकही सामना हरले नाहीत. या दौऱ्यावर शेवटच्या, पाचव्या कसोटीत ब्रॅडमन शून्यावर बाद झाला, आणि त्याची कसोटी सामन्यातील सरासरी शंभरचा आकडा गाठू शकली नाही. एकप्रकारे क्रिकेटच्या सुपुत्राने खेळाला दिलेली ही मानवंदनाच म्हटली पाहिजे. कोणत्याही खेळाडूंपेक्षा खेळ जास्त मोठा…. 

अर्थात डॉन ब्रॅडमन या फलंदाजाने आपली छाप या खेळावर अनेक वर्षांपूर्वीच सोडली आहे. गेल्या ९०-१०० वर्षांत त्याच्या तोडीचा कोणी झाला नाही, होण्याची शक्यता देखील नाही.

Stepping onto the Crease of Leadership: Decoding Don Bradman’s Strategy

Hey there, cricket aficionados and leadership enthusiasts! Guess what? Today isn’t just any day – it’s the birthday of the cricket legend himself, Don Bradman!

So, let’s celebrate in style by delving into the exciting world of cricket, where we’re not just talking about runs and overs, but also uncovering some cool leadership secrets. On this birthday bonanza journey, let together, peel back the curtain on how Don Bradman’s cricket genius can actually make you a better leader. Intrigued? Well, you should be!

The Leadership Stance
Much like a batsman at the crease, a leader needs to stand tall, confident, and ready to face challenges head-on. Don Bradman’s stance at the pitch reflected his unshakable determination, which sent a clear message to his team: “We’re here to conquer.”

Reading the Pitch
Just as Bradman read the pitch to gauge the playing conditions, a leader must read the environment and adapt. Bradman’s approach taught us that understanding the situation, whether it’s a bouncy pitch or a tricky market, is pivotal for success.

The Art of Timing
In cricket, timing is everything, and in leadership, it’s no different. Bradman’s impeccable timing while playing shots can be likened to a leader’s ability to seize opportunities at the right moment, ensuring maximum impact.

Precision and Consistency
Bradman’s astounding average is a testament to his precision and consistency. Translating this to leadership, it’s about consistently delivering quality, making calculated decisions, and aiming for excellence in every endeavour.

Adapting to the Bowlers
Facing different bowlers requires different strategies. Bradman’s flexibility in adapting to various playing styles can teach leaders to tailor their approach based on the team’s strengths and the competition they face.

Mentorship and Team Building
Bradman’s role as a mentor to younger players highlights the importance of grooming talent and fostering a team that harmonizes like a well-coached cricket squad.

Turning Challenges into Opportunities
Bradman’s rise from adversity, such as recovering from an injury, mirrors a leader’s ability to turn setbacks into stepping stones for success.

In the symphony of cricket, Don Bradman conducted an orchestra of leadership lessons that resonated universally. As a thinker, marketer, and cricket aficionado, I encourage you to step onto the crease of leadership with Bradman’s strategy as your guide. Just as he carved his name in cricketing history, you too can make an indelible mark in the world of leadership. So, dear readers, let’s take a page from Bradman’s book, swing our leadership bat with precision, and hit those metaphorical boundaries of success.

Stay inspired, stay in leadership form, and let Bradman’s legacy shine on in the corridors of your endeavours. Until next time, play on and lead strong!

भारतीय वेगवान गोलंदाज 

भारत ही फिरकी गोलंदाजांची खाण समजली जात असे. अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून भारतीय फिरकीने क्रिकेटजगतात आपले स्थान मिळवले. विनू मंकड, सुभाष गुप्तेंपासून सुरु झालेली ही परंपरा आताच्या काळातील कुलदीप यादव, युझवेन्द्र चाहल पर्यंत अबाधित आहे. बेदी, प्रसन्न, चंद्र आणि वेंकट हे तर या फिरकी गोलंदाजीची मानबिंदूच. अनिल कुंबळे, हरभजन सिंग आणि नंतर आलेल्या रविचंद्रन अश्विन सारख्या गोलंदाजांनी फक्त कसोटीच नव्हे, तर एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट मध्ये देखील चमक दाखवली. आपण फिरकी गोलंदाजीतले दादा असलो तरी वेगवान गोलंदाजी हे आपलं अस्त्र कधीच नव्हतं. खरं सांगायचं तर अगदी सुरुवातीच्या काळात मोहम्मद निसार आणि अमर सिंग सारखे दर्जेदार वेगवान गोलंदाज आपल्याकडे होते. भारताच्या पहिल्या कसोटीत (१९३२ साली), त्यांनी इंग्लिश फलंदाजांच्या नाकी नऊ आणले होते. त्यानंतर एखादा रमाकांत देसाई सारखा वेगवान गोलंदाज भारताला लाभला. पण आपली भिस्त कायमच फिरकी गोलंदाजांवर होती. कपिल देवच्या आगमनानंतर हे चित्र थोडंफार बदलत गेलं. कपिलच्या जोडीला करसन घावरी, रॉजर बिन्नी, चेतन शर्मा आदी मंडळींनी भारतीय क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजीला जरा बरे दिवस दाखवले. ९० च्या दशकात जवागल श्रीनाथ भारतीय संघात आला, आणि वेग म्हणजे काय हे आपल्याला उमगलं. पाठोपाठ काही वर्षात अजित आगरकर, झहीर खान, आशिष नेहरा, रुद्रप्रताप सिंग, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार सारखे गोलंदाज देखील भारतीय संघाचा महत्वाचा भाग बनू लागले. २००० च्या दशकात खऱ्या अर्थाने आपण वेगवान गोलंदाजी बघितली असे म्हणता येईल. 


अर्थात या संपूर्ण कालावधीत क्रिकेट देखील बदलत होतंच. आता टी-२० क्रिकेट देखील बहरत होतं आणि क्रिकेटचे आयाम देखील बदलले होते. जगभरच वेगवान गोलंदाजी अधिकच वेगवान होत होती. त्याचे पडसाद भारतीय क्रिकेटवर देखील उमटत होते. गेल्या १० वर्षात आपण अनेक वेगवान गोलंदाजांचा खेळ बघितला. त्यात आयपीएलच्या आगमनानंतर तर प्रत्येक संघात ४-५ भारतीय वेगवान गोलंदाज दिसू लागले. त्यातले काही चमकले, काही काळाच्या ओघात हरवले. पण नवीन गोलंदाज पुढे येण्याचा आयपीएल हा ‘राजमार्ग’ अजूनही तसाच आहे. ती खेळाची गरज आहे, आयपीएल क्रिकेट हे या वेगवान गोलंदाजांना अवघड परिस्थितीमध्ये अजूनच समृद्ध करून जातं हे देखील खरं आहे. आणि अर्थातच त्याचा भारतीय क्रिकेटला सर्वात जास्त फायदा होतो. गेल्या ८-१० वर्षात आपण जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर सारखे भन्नाट गोलंदाज पहिले. यातल्या प्रत्येकाची शैली वेगळी, प्रत्येकाचा वेग वेगळा आणि प्रत्येकाचा प्रभाव निराळा. कदाचित त्यामुळेच आज आपल्याला आपली गोलंदाजी, खास करून वेगवान गोलंदाजी अधिकच बहरल्या सारखी वाटते. आज संघात प्रमुख वेगवान गोलंदाज उपलब्ध नसेल, तर त्याची जागा घेण्यासाठी आपल्याकडे इतर ४ गोलंदाज तयार आहेत. आणि महत्वाचं म्हणजे हे गोलंदाज कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनुभवी नसतील कदाचित, पण आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर खेळण्याचा अनुभव, आणि त्यांची प्रतिभा यामुळे ते आणखीनच प्रभावी ठरतात. 

मागच्या आठवड्यात बुमराहने भारतासाठी पुनरागमन केले. तो गेले जवळजवळ वर्षभर दुखापतीमुळे संघाबाहेर होता. बुमराह सारख्या गोलंदाजांची कमतरता कोणत्याही संघाला निश्चितच जाणवते, पण इतर गोलंदाजांमुळे तो नसणे हे काहीसे सुसह्य झाले. त्याच्या अनुपस्थितीमध्ये मोहमद सिराज सारखा गोलंदाज अधिकच प्रगल्भ झाला, तर उमेश यादव, शार्दूल ठाकूर सारखे गोलंदाजांना संघात आपले स्थान बळकट करण्याची संधी मिळत गेली. मोहम्मद शमी सारखा गोलंदाज भारतीय क्रिकेटचा प्रमुख वेगवान गोलंदाज झाला तर उमरान मलिक, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार सारखे गोलंदाज भारतीय संघात येण्याची स्वप्ने बघू लागले. यातील काही चमकले, तर काही काळाच्या पडद्याआड गेले, जातीलही. पण एक गेला की अजून काही खेळाडू  या न्यायाने इतर अनेक वेगवान गोलंदाज आज रांगेत उभे आहेत. गेल्या काही वर्षात आयपीएल आणि अंडर १९ संघांच्या यशामुळे अनेक उत्तमोत्तम वेगवान गोलंदाज आपल्यासाठी  विविध स्तरांवर खेळताना दिसतात. टी. नटराजन, शिवम मावी, कमलेश नागरकोटी, कार्तिक त्यागी, राजवर्धन हंगर्गेकर, तुषार देशपांडे ही त्यातलीच काही महत्वाची नावं. पुढेमागे ते भारतासाठी खेळतीलही, पण आजच्या घडीला भारतीय वेगवान गोलंदाजांच्या यादीत हे खेळाडू आहेत हे नक्की. 


काही वर्षांपूर्वी भारतात सुरु झालेल्या MRF पेस अकॅडमीने ९० आणि २००० च्या दशकात चांगली फळे दिली. तिथून येणारे गोलंदाज बऱ्यापैकी तावून सुलाखून निघत. ‘वेग’ ही गोष्ट मानवाला प्रभावित करणारीच आहे. नुकतीच गोलंदाजीची सुरुवात केलेले हे ‘रॉ’ खेळाडू त्यापासून दूर कसे असणार? भारतातील क्रिकेट फोफावत गेलं तसं इथे या वेगवान गोलंदाजांचा एक वेगळा क्लास दिसू लागला. हे गोलंदाज ऑस्ट्रेलिया, इंग्लंड सारख्या खेळपट्ट्यांवर कमाल करत होतेच, पण ते आता भारतीय खेळपट्ट्यांवर देखील धमाल करू लागले.  कपिलच्या उदयानंतर आपल्या वेगवान गोलंदाजीचा पहिला अध्याय सुरु झाला होता, इशांत-बुमराह-शमी नंतर आता दुसरा अध्याय सुरु झाला आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अर्थात इतर वेगवान गोलंदाजांप्रमाणेच आपले गोलंदाज देखील ‘वेगवान’ गोलंदाजांना येणाऱ्या समस्यांना तोंड देत असतातच. त्यांना जाणाऱ्या दुखापती ही सगळ्यात मोठी समस्या. त्यादृष्टीने प्रत्येक गोलंदाजाने स्वतःची आणि भारतीय बोर्डाने आपल्या सगळ्याच गोलंदाजांची काळजी घेणे आवश्यक ठरते. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने, कमी जास्त प्रमाणात हे करत असतोच, आणि त्यात काही चुका देखील होतात. पण ही एक प्रोसेस आहे, आणि या गोष्टी नैसर्गिकरित्या घडत राहणारच. 

हे वेगवान गोलंदाज भारतासाठी चांगली कामगिरी करून येणाऱ्या काळात आपल्याला चांगले विजय मिळवून देवो हीच अपेक्षा आहे. वेगवान गोलंदाजांचा कार्यकाळ, अपवाद वगळता, खूपच कमी असतो. अशावेळी दुखापतग्रस्त न होता, देशासाठी चांगला खेळ करणे ही त्यांची जबाबदारी ठरते. आणि आता अगदी तरुण वयात असलेले हे खेळाडू नक्कीच त्यांच्या बॉलिंग विषयी, वेगाविषयी, अचूकतेविषयी जागरूक आहेत. आणि म्हणूनच भारतीय वेगवान गोलंदाजांचे भविष्य उज्ज्वल आहे असे म्हणता येईल. आता भारत ही केवळ फिरकीपटूंची भूमी राहिली नसून, या मातीत उत्तमोत्तम वेगवान गोलंदाज देखील चांगली कामगिरी करत आहेत ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. 

To know more about Crickatha