ball

Readers’ Articles

by स्वप्नील

एखाद्या राजाला स्वतःचा इतका अहंकार असतो, कि आपण कधीच पराभूत होउ शकत नाही,पण एखाद युद्धरूपी वावटळ येते अन त्याचा पराभव करून जाते.त्याचक्षणी क्षणार्धात त्याचा अहंकार, माज, गर्व सर्वकाही उतरलेलं असतं. तसाच काही प्रकार ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात झाला असे म्हणायला हरकत नाही.

2006 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये झालेल्या पाच सामन्याच्या मालिकेत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते.पाचवा सामना जो जिंकेल तो मालिका विजयी होणार होता. ऑस्ट्रेलिया ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली.त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघाचा इतका दरारा होता कि त्यांच्या दरार्यासारखीच गिलख्रिस्ट आणि कॅटिच ने दमदार सुरवात केली… पाँटिगचे शतक आणि शेवटच्या षटकांमध्ये हसीच्या फटकेबाजीने त्या दमदार सुरवातीनंतर 434 धावांचे टोलेजंग आव्हान ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर उभे केले. 2000-2006 चा काळ म्हणजे 260-270 धावा झाल्या तरी ती आव्हानात्मक धावसंख्या वाटायची.त्या काळात 434 धावा म्हणजे विजयी कोण होणार हे सांगायची गरजच भासणार नव्हती. त्यातल्या त्यात आफ्रिकेवर चोकर्स चा टॅग आणि त्या टॅगसारखीच आफ्रिकेची सुरवात झाली.सलामीवीर डिप्पेनार दुसर्याच षटकात बाद झाला त्यामुळे आफ्रिका विजयी होईल हे कोणी म्हणुच शकले नसते.

मात्र वनडाऊन ला आलेला हर्षेल गिब्ज (111 चेंडु 175 धावा) आणि सलामवीर कर्णधार ग्रॅम स्मिथ (55 चेंडु 90 धावा) एक वेगळ्याच जोशात मैदानावर उतरल्यासारखे दिसत होते.435 धावांच्या आव्हानाचे दडपण त्यांच्या चेहर्‍यावर अजिबात दिसत नव्हते. हर्षेल गिब्जचा धडाका तर येवढा होता कि, एकदिवसीय सामन्यातला पहिला द्विशतकवीर होतो कि, काय याची उत्सुकता सगळ्यांमध्ये निर्माण झाली होती.कारण तो बाद झाला तेव्हा डावातले 32 वे षटक चालु होते. आफ्रिकन संघाच्या धावा झालत्या
299.अजुनही 135 धावा लागत होत्या आणि गिब्ज बाद झालता 175 धावेंवर.तो अजुन खेळतोय तर द्विशतक पक्केच होते.मात्र तो बाद झाल्यानंतर कॅलिस, डिव्हीलियर्स, जस्टिन कॅम्प ही मंडळीही जास्त वेळ मैदानावर तग धरू शकली नाही.

संघाचे सहा बाद झाले आफ्रिकेची एकमेव आशा होती आता बाऊचरवर आणि त्याप्रमाणे सगळी सुत्रे हातात घेऊन मार्क बाऊचरने त्याची खेळी चालुही केली. त्यातल्या त्यात बाऊचरला साथ द्यायला आलेल्या जाॅन व्हर डॅथ ने 18 चेंडुत 35 धावा करत सामना आफ्रिकेच्या बाजुला नेऊन ठेवला. इतका सहज सामना जिंकतील ती आफ्रिका कसली पण मार्क बाऊचर समंजस्य पणे एक बाजु लावुन खेळत होता हीच आफ्रिकेच्या दृष्टीने जमेची बाब होती. सामना जिंकायला 4 चेंडुमध्ये 2 धावांचे समीकरण असताना हाॅल बाद झाला.आफ्रिकेची अवस्था 9 बाद 433 धावा.जिंकण्यासाठी दोन धावा..अन शेवटची जोडी मैदानात.आफ्रिकेच्या दृष्टीने अजुनही जमेची बाब हि होती कि, बाऊचर मैदानावर होता.

3 चेंडु 2 धावा.मखाया एन्तिनी स्ट्राइक ला,ब्रेटली गोलंदाजी मार्कवर… एक धाव घेत सामना बरोबरीत.सामना बरोबरीत झाल्यावर 1999 च्या विश्वचषकातली पुनरावृत्ती पुन्हा पाहायला मिळतेय कि काय असे वाटत असताना मार्क बाऊचरने मारलेला फटका मिड ऑन च्या वरून जात चौकाराला जाऊन भिडला.त्या चौकाराबरोबरच न भुतो न भविष्यती अशा सामन्यात आफ्रिका संघ विजयी झाला.मखाया एन्तिनी ची ती एक धाव सुद्धा शतकापेक्षा कमी नव्हती. चार तासापुर्वी 400 धावा करत ऑस्ट्रेलियाने एक वर्ल्ड रेकाॅर्ड केला होता अन तेच आव्हान पार करत आफ्रिकेने एक अनोखा किर्तिमान रचला. नॅटवेस्ट चा भारत अन इंग्लंड सामन्यानंतर जर कोणता सामना बघायला आवडला असेल तर हाच …

To know more about Crickatha