मराठीमधील क्रिकेटविषयक पहिला डिजिटल दिवाळी अंक!
प्रकाशन पुर्व नोंदणी सुरु
जाणून घ्या CRICकथा
CRICकथा हा मराठीमधील क्रिकेटविषयक पहिला डिजिटल दिवाळी अंक आपल्यासमोर सादर करताना अतिशय आनंद होत आहे. क्रिकेट हा आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. अगदी लहानांपासून ते घरातल्या ९० वर्षांच्या आजोबांपर्यंत प्रत्येकजण क्रिकेटविषयी भरभरून बोलतो. पु. ल. म्हणतात त्याप्रमाणे, क्रिकेट हा मुख्यत्वे खेळण्याचा नसून, बोलण्याचा विषय आहे. दुर्दैवाने, सध्याच्या घडीला समाज माध्यमांवर क्रिकेटविषयी (आणि एकूण सर्वच गोष्टींविषयी) वाईट पद्धतीने चर्चा केली जाते. ह्या सगळ्या गदारोळात कुठेतरी क्रिकेटविषयक काहीतरी चांगले, गुणवत्ता युक्त आणि आपल्या मायबोलीत - मराठीमध्ये उपलब्ध व्हावे हा ह्या दिवाळी अंकाचा मुख्य हेतू.